18 October 2018

News Flash

Sexiest Asian Woman : ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत दीपिकापेक्षा टीव्ही अभिनेत्री सरस

लंडन येथील 'इस्टर्न आय' या साप्ताहिकाने घेतलेल्या पोलनुसार ही यादी जाहीर करण्यात आली.

दीपिका पदुकोण

‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या गेल्या वर्षीच्या यादीत दीपिका पदुकोणने प्रियांका चोप्राला मागे टाकले होते. या यादीत ती अग्रस्थानी होती. मात्र, यावर्षी प्रियांकाने तिचा पहिल्या क्रमांकाचा मान पुन्हा मिळवला आहे.

वाचा : शनाया वागणार ‘शान्यासारखं’!

‘सेक्सिएस्ट एशियन वूमन २०१७’च्या यादीत प्रियांकाने दीपिकाला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या साप्ताहिकाने घेतलेल्या पोलनुसार ५० सेक्सिएस्ट एशियन वूमनची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत सलग पाचव्यांदा येण्याचा विक्रम प्रियांकाने केला आहे. तर दीपिकाचे नाव पहिल्या स्थानावरून चक्क तिसऱ्या स्थानावर घसरले आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या स्थानावर असणारी टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्माने दुसरे स्थान मिळवले असून तिने दीपिकाला मागे टाकले.

सेक्सिएस्ट एशियन वूमन २०१७ च्या यादीत पहिल्या सहामध्ये अनुक्रमे प्रियांका चोप्रा, निया शर्मा, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, माहिरा खान आणि द्रष्टी धामी यांनी स्थान मिळवले आहे.

वाचा : अध्यात्माकडेही जॉनचा कल, घेतली दलाई लामांची भेट

जगभरात प्रसिद्ध असलेल्या प्रियांकाने तिला मत देणाऱ्यांचे आभार मानले. या वर्षात प्रियांकाच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आपल्या यशाचा चढता आलेख तिने कायम राखला. वर्षाच्या सुरुवातीला तिने ‘बेवॉच’ चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात ती ड्वेन जॉन्सनसोबत झळकली. ‘क्वांटिको’ मालिकेसाठी तिला ‘पिपल्स चॉइस अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. यानंतर तिने ‘अ किड लाइक जेक’ आणि ‘इजन्ट इट रोमॅण्टिक?’ हे दोन मोठे हॉलिवूड चित्रपट साइन केले. विशेष म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीतही तिने पदार्पण केले. तिची निर्मिती असलेल्या ‘व्हेंटिलेटर’ला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

First Published on December 7, 2017 11:29 am

Web Title: priyanka chopra reclaims the throne of sexiest asian woman from deepika padukone nia sharma becomes second sexiest asian