News Flash

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहण्यास आवडेल – प्रियांका चोप्रा

निकने अमेरीकेच्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरावे असं प्रियांका म्हणाली

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि विदेशी बाबू निक जोनस नेहमी चर्चेत असतात. मग ते त्यांनी शेअर केलेले फोटो असोत किंवा खरेदी केलेली गाडी असो त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच. त्यातच टमिस वर्ल्डटपासून ते हॉलिवूडच्या प्रवासानंतर प्रियांका राजकारणात प्रवेश करु इच्छित असल्याचे वक्तव्य तिने केले आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांकाला तिच्या कामाशी संबंधीत आणि खाजगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान प्रियांकाने तिला राजकारणात रस असल्याचे देखील स्पष्ट केले. ‘मला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरायला आवडेल आणि निकने अमेरीकेच्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरावे अशी माझी इच्छा आहे’ असे प्रियांका म्हणाली.

‘मला राजकारणाशी संबंधीत कोणत्याच गोष्टी आवडत नाहीत पण आम्हा दोघांनाही बदलाची अपेक्षा आहे’ असे प्रियांका पुढे म्हणाली. तसेच प्रियांकाचा पती निकला राजकारणात काडीमात्र रस नसल्याचे देखील प्रियांकाने स्पष्ट केले.

सध्या प्रियांका चित्रपट निर्मात्या सोनाली बोस यांच्या आगामी चित्रपट ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटा प्रियांकासह अभिनेता फरहान अख्तर प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट आयशा चौधरी हिच्या जीवनावर आणि तिने लिहीलेल्या ‘माय लिटिल एपिफेनिस’ या पुस्तकावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये प्रियांका, फरहान यांच्यासह जायरा वसीम झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 12:41 pm

Web Title: priyanka chopra said i would love to run for prime minister of india
Next Stories
1 सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी असलेली बॅट रणवीरने तब्बल इतक्या रकमेत घेतली विकत
2 आयुषमानसह ‘बाला’ चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्यांना पोलिसांकडून समन्स
3 दत्तक असल्याचं समजताच सुष्मिता सेनच्या मुलीची होती ‘ही’ प्रतिक्रिया
Just Now!
X