News Flash

‘बेवॉच’च्या पोस्टरवर फक्त प्रियांकाचीच जादू

प्रियांकाने नुकतेच 'ग्लॅमर' या आंतरराष्ट्रीय मासिकासाठी हॉट फोटोशूट केले

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राच्या ‘बेवॉच’ या पहिल्या हॉलिवूडपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या नवीन पोस्टरमध्ये प्रियांकाला मध्यभागी ठेवून सिनेमातले तिचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘बेवॉच’च्या प्रमोशनमध्ये प्रामुख्याने प्रियांकालाच दाखवले जात आहे. प्रियांका या सिनेमात व्हिक्टोरिया लीड्स ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. जर खलनायिका एवढी मादक असेल तर कोणताही नायक घायाळ होईलच ना? या नवीन पोस्टरमध्ये प्रियांकाला मध्यभागी ठेवण्यात आले असून तिचा चेहराही स्पष्ट दिसेल याची काळजी घेण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये प्रियांका ड्वेन जॉन्सन आणि झॅक एफरॉनच्या मध्ये उभी राहिलेली दिसते. या सिनेमात ड्वेन आणि झॅक हे प्रियांकापासून ‘बेवॉच’ला वाचवण्याची कामगिरी बजावताना दिसणार आहेत.

‘बेवॉच’च्या पहिल्या दोन ट्रेलरमध्ये प्रियांकाला अधिक वेळ दाखवण्यात आले नव्हते. त्यामुळे तिचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. पण तिसऱ्या ट्रेलरमध्ये मात्र फक्त प्रियांकाच दिसते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सुरूवातीला ड्वेन जॉन्सनने त्याच्या ट्विटवर अकाऊंटवरून ‘बेवॉच’चा नवा ट्रेलर प्रसिद्ध केला होता. ‘द रॉक’नेही सिनेमासाठी प्रियांका कशी योग्य आहे हे अनेकदा सांगितले आहे. सेथ गॉरडन दिग्दर्शित या सिनेमात अॅलेक्झँडर ददारिओ, केली रोहबेच यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २ जून प्रियांकाचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

प्रियांकाने नुकतेच ‘ग्लॅमर’ या आंतरराष्ट्रीय मासिकासाठी हॉट फोटोशूट केले. ‘ग्लॅमर’ मासिकासाठी फोटोशूट केल्यानंतर आता नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय मासिकांपैकी एकही मासिक उरलेलं नाही ज्यासाठी प्रियांकाने फोटोशूट केले नाही. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या मासिकासाठी केलेल्या फोटोशुटचा एक फोटो शेअर केला आहे. ऑस्करपासून ग्रॅमी अवॉर्ड्सपर्यंत सगळीकडे प्रियांकाचाच जलवा पाहायला मिळत आहे. सध्या बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सगळीकडे प्रियांकाचीच चर्चा होताना दिसत आहे. पण सगळेच दिवस सारखे नसतात याची तिला चांगलीच कल्पना आहे. त्यामुळेच जेवढे दिवस लोकांना मला पाहायला आवडतं तेवढे दिवस मी नक्की काम करणार असं ती ठामपणे सांगते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 2:58 pm

Web Title: priyanka chopra takes centre stage in new baywatch poster
Next Stories
1 कतरिनाचा द्वेष करणाऱ्यानेही केले तिचे स्वागत
2 कपिलच्या शोमधील या कलाकारासोबत लग्न करणार सुगंधा मिश्रा?
3 राजामौली, प्रभास १२१ कोटी रुपये शहीदांच्या कुटुंबियांना देणार ही केवळ अफवा
Just Now!
X