18 September 2020

News Flash

प्रियांका चोप्रा दुसऱ्यांदा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ची मानकरी

यापूर्वी तिला ‘सात खून माफ’ मधील अभिनयाकरिता सन्मानित करण्यात आले होते.

बॉलीवूड आणि हॉलीवूडला आपल्या अभिनयाने भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला नुकताच ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे तिला हा पुरस्कार दुस-यांदा मिळणार आहे. प्रियांका यापूर्वी ‘सात खून माफ’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाकरिता दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आता दादासाहेब फाळकेंच्या १४७ जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार प्रियंकाला मिळणार आहे. येत्या २४ एप्रिलला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. मात्र, प्रियांका या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 6:16 pm

Web Title: priyanka chopra to win her second dadasaheb phalke award
टॅग Priyanka Chopra
Next Stories
1 रणवीर-वाणीचा ‘लिप लॉक’
2 हॅरी पॉटरचे लेखन करताना वापरलेल्या खुर्चीचा २.६ कोटींमध्ये लिलाव
3 हरभजनची पत्नी गीता देणार गोड बातमी?
Just Now!
X