News Flash

‘फॅमिली प्लॅनिंग’बद्दल प्रियांकाचं वक्तव्य, म्हणाली..

प्रियांका आणि निकने २०१८ मध्ये केलं लग्न

सेलिब्रिटींमध्ये सर्वांत चर्चेत राहणारी जोडी म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास. हे दोघे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. मात्र आता प्रियांकाने त्यांच्या फॅमिली प्लॅनिंगवर केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

संडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका म्हणाली, “लॉकडाऊनमध्ये मला निकी सोबत खूप वेळ घालवायला मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. मला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असतील तरी चालेल. पण मुलांची संख्या इतकी पण नको की त्यांचीच एक वेगळी क्रिकेट टीम बनेल.”

आणखी वाचा- ‘ही’ व्यक्ती ठेवणार विराट-अनुष्काच्या मुलीचं नाव

प्रियांका आणि निक यांच्यात १० वर्षांचा फरक आहे. ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात पहिल्यांदा प्रियांका आणि निक एकत्र काम करणार आहेत. हा रोमॅण्टिक ड्रामा आहे. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध लेखक जीम स्ट्रॉसे यांनी लिहिली असून दिग्दर्शनदेखील त्यांनीच केलं आहे. हा चित्रपट एका जर्मन कादंबरीवरुन साकारण्यात येत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त प्रियांका ‘द व्हाइट टायगर’ या बॉलिवूडपटातदेखील झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 2:48 pm

Web Title: priyanka chopra want as many children as she can but not a cricket team dcp 98
Next Stories
1 ‘सुहानी सी एक लडकी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
2 “हा सलमान खानचा चित्रपट नव्हता”; टीकाकारांवर दिग्दर्शिका संतापली
3 अभिज्ञा भावे पाठोपाठ आणखी एक मराठमोळा अभिनेता अडकला लग्न बंधनात
Just Now!
X