News Flash

जाणून घ्या प्रियांका चोप्राचे नवीन वर्षातले संकल्प

प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वी भारतात परतली आहे

प्रियांका चोप्रा

नवीन वर्ष जसे जवळ येते तसे प्रत्येकजण आपल्या नवीन वर्षातले संकल्प आखायला सुरुवात करतात. यातले किती संकल्प पूर्ण होतात आणि किती अर्धवट राहतात हे तर प्रत्येकालाच माहित. पण, असेही काही कलाकार आहेत जे प्रांजळपणे कबूल करतात की ते प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्प करतात आणि पुढच्या दोन दिवसातच तो संकल्प विसरुनही जातात. पण कलाकारांचे नवीन वर्षातले संकल्प असतात तरी काय हे जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडते, हो ना? तर मग चला जाणून घेऊया बॉलिवूडहून हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या प्रियांका चोप्राचे संकल्प आहेत तरी काय..

प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वी भारतात परतली आहे. एवढ्या दिवसांनंतर मुंबईमध्ये आल्यानंतर ती अनेक पार्ट्यांमध्येच व्यग्र दिसत आहे. नवीन वर्षाचे स्वागतही तिने आपली आई आणि भावासोबतच करणे पसंत केले होते. पण नंतर जेव्हा तिला तिच्या संकल्पांबद्दल विचारले तेव्हा ती हसत म्हणाली की, मी कोणतेही संकल्प बनवत नाही. कारण मी ते ३ जानेवारीलाच तोडते. पण यावर्षी मी ठरवले आहे की मी अजून सुदृढ होणार. मी यावर्षी कॉफी सोडू इच्छिते, चांगली झोप घेऊ इच्छिते तसेच नियमित जीमलाही जावं असं वाटते. हेच माझे संकल्प आहेत. पण मला हेही माहित आहे की यातले काही होणार नाही पण तरीही मी प्रयत्न मात्र नक्कीच करणार आहे. जसे प्रियांका म्हणाली त्याप्रमाणे कोणताही संकल्प पुर्णत्वाला नेणे तसे कठीणच असते.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आगामी ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स’ समारंभाचे सुत्रसंचालन करणार आहे. अमेरिकी टीव्ही शो ‘क्वांटिको’ आणि हॉलिवूड सिनेमा ‘बेवॉच’ यामध्ये काम केल्यानंतर आता प्रियांका लवकरच ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स’ समारंभाचे सुत्रसंचालन करणार आहे. अॅना केंड्रिक आणि स्टीव कैरल यांच्यासोबत प्रियांका या समारंभाचे सुत्रसंचालन करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 8:07 pm

Web Title: priyanka chopras new year resolution
Next Stories
1 अर्जुन कपूरच्या अनाधिकृत जीमवर अखेर हातोडा
2 पुन्हा एकदा खेळाडूच्या भूमिकेत दिसणार सुशांत सिंग राजपूत
3 ‘रईस’मधल्या एका दृश्यासाठी फोडल्या इतक्या हजार बाटल्या
Just Now!
X