लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी पार पडले. यावेळी बऱ्याच सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर मतदान केल्यानंतरचा फोटो पोस्ट करत नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. अभिनेता पुष्कर श्रोत्रीनेही मतदानाचा हक्क बजावल्यानंतर फोटो पोस्ट करत ट्विट केलं. पण या ट्विटमुळेच तो सध्या ट्रोल होतोय.

‘तब्बल एक-सव्वा तास सामान्य नागरिकाप्रमाणे लाईनीत घामाघूम अवस्थेत उभं राहून सामान्य नागरिकाचा पहिला हक्क बजावून आलोय! मतदान करुन आल्याचा आनंद काही वेगळाच,’ असं ट्विट पुष्करने केलं आहे. सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक सर्वांनीच रांगेत उभं राहून मतदान केलं पाहिजे असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. तर सेलिब्रिटींना रांग न लावता थेट मतदान करण्याची संधी देऊ नये अशी भूमिका नेटकऱ्यांनी मांडली आहे.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

या असामान्य लोकांवर अन्याय झाला आहे, अशी उपरोधिक टीकासुद्धा एका युजरने केली. ‘हे सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभा राहून मतदान केलं म्हणजे काय? तुमचं हे एक कर्तव्य आहे मग तो कोणता नट असो किंवा राजकारणी त्यात एवढं नवल कशासाठी,’ असंही एकाने म्हटलं.

मतदानाच्या दिवशी अनेक सेलिब्रिटी रांग न लावता थेट मतदान करण्यास जातात आणि सामान्य नागरिक मात्र तासनतास रांगेत उभे राहतात. त्यामुळे सर्वांना समान संधी दिली पाहिजे, असं नेटकऱ्यांचं मत आहे.