News Flash

आर डी बर्मन यांच्या लग्नाचा हा किस्सा माहितीये का?

हे दोघे दार्जिलिंगमध्ये भेटले होते.

आर डी बर्मन यांच्या लग्नाचा हा किस्सा माहितीये का?
आर.डी.बर्मन

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आर.डी.बर्मन हे संगीताला वेगळी परिभाषा देण्यासाठी नावाजले जातात. त्यांनी दिलेले फ्यूजन संगीत हे आजही प्रसिद्ध आहे. पंचम दा म्हणून ओळखल्या जाणा-या आर.डी.बर्मन यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वडील एस.डी.बर्मन यांच्याकरिता ‘ए मेरी टोपी पलटके आ’ हे गाणे संगीतबद्ध केले होते. देव आनंद यांच्या ‘हरे राम हरे कृष्णा'(१९७०) या चित्रपटातील त्यांनी संगीत दिलेले ‘दम मारो दम’ हे गाणे आजही प्रसिद्ध आहे.

वाचा : जाणून घ्या, आर. डी बर्मन यांच्याविषयी रंजक गोष्टी

बॉलिवूड चित्रपटांना संगीत देणाऱ्या पंचमदांच्या लग्नाचा किस्सादेखील अगदी चित्रपटांच्या कथेसारखाच रंजक असा आहे. आर डी बर्मन यांनी त्यांची चाहती रिटा पटेल हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. हे दोघे दार्जिलिंगमध्ये भेटले होते. बर्मन यांच्याबरोबर मुव्ही डेटला जाण्याची पैज रिटाने आपल्या मैत्रिणींबरोबर लावली होती. विशेष म्हणजे तिने ते करूनही दाखवले. त्यानंतर या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी १९६६ मध्ये लग्न केले. परंतु, हे लग्न फार काळ टिकले नाही. १९७१ मध्ये दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. याच काळात ‘मुसाफिर हूं यारों’ हे ‘परिचय’ चित्रपटातील गाणे पंचमदांनी एका हॉटेलच्या खोलीत बसून लिहिले होते. नंतर १९८० मध्ये त्यांनी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्याशी लग्न केले. दोघांनाही पहिल्या लग्नाचा काही फारसा चांगला अनुभव आला नव्हता. गणपतराव भोसले हे आशाजींची पहिले पती होते.

वाचा : स्वतःचं घर घेण्यासाठी सलमानला कमी पडताहेत पैसे!

पंचम दा आणि आशा भोसले हे दोघेही एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे होते. मात्र, संगीतामुळेच या दोघांच्या आयुष्याचे सूर जुळले. या दोघांनी मिळून अनेक गाणी गायली तसेच त्यांनी लाइव्ह परफॉर्मन्सही दिले. ओ मेरे सोना रे, दुक्की पे दुक्की हो, मौसम मस्ताना, केह दू तुम्हे, आजा आजा मैं हू प्यार तेरा, सुनले जमीन आसमाँ,  दम मारो दम यांसारखी अनेक गाणी आशाजींनी आर डी बर्मन यांच्यासाठी गायली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 10:45 am

Web Title: r d burman and his first wife rita patel intresting love story
Next Stories
1 आमिरची अविश्वसनीय ‘दंगल’ सुरुच, विक्रमांचा आणखी एक डोंगर सर
2 R D Burman Birth Anniversary: जाणून घ्या, आर. डी बर्मन यांच्याविषयी रंजक गोष्टी
3 …म्हणून फेसबुकवर बिग बी नाराज
Just Now!
X