भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीताला नवीन परिभाषा दिली. आपल्या काळाच्या पुढे असणारे पंचमदांचा २७ जून हा जन्मदिवस. आज त्यांची ७८ वी जयंती. त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांची संगीत रसिकांना चांगलीच जाण आहे. जाणून घ्या पंचमदांविषयीच्या अन्य गोष्टी…

१. पंचमदा नावाने प्रसिध्द असणऱ्या आर. डी. बर्मन यांना चित्रपटसृष्टीतदेखील याच नावाने बोलावले जात असे. तसेच ते तुबलु नावानेदेखील परिचित होते. त्यांना हे नाव त्यांच्या आजीने दिले होते. पंचम हे नाव त्यांना अशोक कुमार उर्फ दादामुनींकडून मिळाले होते. बाल्यावस्थेतील आरडींसारखा ‘पा’ असा उच्चार करीत, हे पाहून दादामुनींनी त्यांचे नाव पंचम असे ठेवले. पुढे ते याच नावाने प्रसिध्द झाले. बर्मन यांच्या रोमारोमात संगीत होते.

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

२. वयाच्या नवव्या वर्षी पंचमदांनी आपले पहिले गाणे संगीतबद्ध केले, ज्याचा वापर १९५६ च्या ‘फंटूश’ चित्रपटात करण्यात आला.
३. पंचमदांचे वडील एस. डी. बर्मन हे देखील प्रसिद्ध संगीतकार होते. एस. डी. बर्मन यांच्या ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू’ , ‘सिर जो तेरा चकराए’, ‘कोरा कागज था ये मन मेरा’ या गाण्यांमध्ये पंचमदांचादेखील सहभाग होता.

४. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल आर. डी. बर्मन यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये वाद्य वाजवत असत. कुमार शानू, अभिजीत, मोहम्मद अजीज, शबीर कुमारसारख्या अनेक नवोदित गायकांना पंचमदांनी पहिल्यांदा गायनाची संधी दिली.

वाचा : देव आनंद यांच्या भावासोबत ही अभिनेत्री होती लिव्ह इनमध्ये; निर्दयीपणे झाली होती तिची हत्या

५. संगीतात नवीन प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. ‘चुरा लिया’ गाण्यासाठी ग्लासवर चमच्याने हळूवार प्रहार करून त्यांनी आवाज ध्वनिमुद्रित केला होता. एकदा पावसाचा आवाज ध्वनिमुद्रित करण्यासाठी त्यांनी अख्खी रात्र पावसात घालवली होती.

६. खूप कमी जणांना माहित असेल की, ‘सोलवा साल’ चित्रपटातील हेमंत कुमार यांनी गायलेल्या ‘है अपना दिल तो आवारा’ या गाण्यातील माउथ ऑरगन हे स्वतः आर.डी.बर्मन यांनी वाजवले होते.

७. ‘चुरा लिया’ या गाण्यात बर्मन यांनी ग्लासवर चमचा मारून निर्माण होणा-या ध्वनीचा वापर केला होता.

८. ‘परिचय’ या चित्रपटातील त्यांचे ‘बीती ना बिताये रैना’ हे गाणे एका हॉटेल रूममध्ये ध्वनीबद्ध करण्यात आले होते. या गाण्यासाठी लता मंगेशकर आणि भूपिंदर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

९. हिंदी चित्रपटसृष्टीत ब्राझिलचे बोस्सा नोव्हा रिदमचा वापर करणारे बर्मन हे पहिले संगीतकार होते. ‘पती पत्नी’ चित्रपटात आशा भोसले यांनी गायलेल्या ‘मार डालेगा दर्द-ए-दिल’ गाण्यासाठी या रिदमचा वापर करण्यात आला होता.

१०. ‘अब्दुल्ला’ गाण्यासाठी बर्मन यांनी बांबूला फुगा बांधून त्यातून निर्माण होणा-या ध्वनीचा संगीतासाठी वापर केला होता.