News Flash

आर. के. स्टुडिओची मालकी आता ‘गोदरेज प्रॉपर्टीज’कडे

आर. के. स्टुडिओचे नवे मालक 'गोदरेज प्रॉपर्टीज' असून त्याठिकाणी आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहेत.

आर. के. स्टुडिओ

जवळपास ७० वर्षांहून अधिक काळ मुंबईतील चेंबूर येथे उभ्या असलेला आर. के. स्टुडिओ अखेर ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने विकत घेतला आहे. शुक्रवारी या कंपनीने आर. के. स्टुडिओ विकत घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेल्या आर. के. स्टुडिओचे नवे मालक ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ असून त्याठिकाणी आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहेत.

या स्टुडिओच्या विक्रीची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून कपूर कुटुंबीय गोदरेज प्रॉपर्टीजशी चर्चा करत होते. ‘२.२ एकर क्षेत्रात पसरलेल्या आर. के. स्टुडिओच्या ३३,००० वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक निवासी अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत,’ अशी माहिती ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ कंपनीने दिली.

रणधीर कपूर यांनीसु्द्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘माझ्या कुटुंबासाठी चेंबूरमधील ही जागा फार महत्त्वपूर्ण आहे. या जागेवर आता नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीला निवडले आहे,’ असं त्यांनी सांगितलं.

स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न हे फारच कमी असल्यामुळे त्याच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर, मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव आणि मुलगी रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकमताने स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला असून स्टुडिओची विक्री झाल्यानंतर त्यातून येणारा नफा स्टुडिओशी संबंधित प्रत्येकाला देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 12:12 pm

Web Title: r k studios sold to godrej properties randhir kapoor confirms
Next Stories
1 कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घ्यायचाय? या प्रश्नाचे उत्तर द्या..
2 ‘सडक २’मध्ये आलिया भट्ट साकारणार ही भूमिका
3 या तारखेला प्रदर्शित होणार ‘PM नरेंद्र मोदी’ चित्रपट
Just Now!
X