दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा आगामी ‘राधे श्याम’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी प्रभास आणि पूजाच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.या टीझरमध्ये प्रभास पूजासोबत रेल्वे स्टेशनवर फर्ल्ट करताना दिसत आहे.
टी-सीरिजने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला एक रेल्वे स्टेशन दिसत आहे. तर प्रभास स्टेशनवर उंच उडी मारत इटालियन भाषेत Sei Un Angelo? Devo Morire per incontrarti? बोलत त्याची प्रेयसी पूजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर भेटल्यावर पूजा प्रभासला बोलते तू स्वत:ला रोमियो समजतोस. यावर उत्तर देत प्रभास बोलतो, त्याने प्रेमासाठी जीव दिला होता मी त्याच्यासारखा नाही.
This Valentines, let us celebrate love with the biggest announcement of the year! #RadheShyam to release in a theatre near you on 30th July! #ValentinesWithRS
Telugu : https://t.co/zMlXyr5F3U
Hindi : https://t.co/rDt53toIpF
Tamil : https://t.co/jia3eogHlg pic.twitter.com/ojXBgVUgPm
— T-Series (@TSeries) February 14, 2021
“या व्हॅलेन्टाइनला, वर्षातील सगळ्यात मोठ्या घोषणेसह, प्रेमाचा आनंद घेऊया, ३० जुलै २०२१ ला राधे श्याम चित्रपट गृहात प्रदर्शित होणार,” अशा आशयाचे ट्विट करत टी-सीरिजने चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.
चित्रपटाची पहिली घोषणा झाल्यापासून चाहते प्रभास आणि पूजाचा रोमांस पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘राधे-श्याम’ हा चित्रपट राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहुभाषिक चित्रपट आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरिज याचे सादरीकरण करणार आहेत. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.