26 September 2020

News Flash

सलमानचा राधे होणार OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित?

सलमानच्या मॅनेजरने केला खुलासा.

बॉलिवूडाचा भाईजान सलामान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार होता. पण सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपटांचे आणि मालिकांचे चित्रीकरण बंद करण्यात आले. अशातच भाईजानचा ‘राधे’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी २५० कोटींची मागणी केल्याची देखील चर्चा सुरु आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व अफवा असल्याचे समोर आले आहे. पण या संदर्भात सलमानच्या मॅनेजर जॉर्डी पटेल याने अशी काही ऑफर असल्यास आम्ही विचार करु असे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. ‘आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर देशातील परिस्थिती पाहून विचार करु की राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायचा की नाही’ असे त्यांने म्हटले.

त्यानंतर त्याला सध्या राधे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही एखाद्या रक्कमेचा विचार केला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘आम्ही जर मीटिंग झाली तर किती पैसे घ्यायचे याचा विचार केलेला नाही. चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आम्ही रक्कम कशी ठरवणार? चित्रपटातील काही सीन आणि गाण्याचे चित्रीकरण अजूनही बाकी आहे’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 12:57 pm

Web Title: radhe wanted bhai asking rs 250 crores direct ott release salman khans manager clarifies avb 95
Next Stories
1 पुढच्या जन्मी माझ्याशी लग्न करशील का? विचारणाऱ्याला रवीनाचं भन्नाट उत्तर
2 शर्लिन चोप्राने सांगितला कास्टिंग काऊचचा कोडवर्ड
3 “चिंटू सर, कहा सुना माफ”,…म्हणून ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सलमान खानने मागितली माफी
Just Now!
X