23 November 2020

News Flash

मी केवळ व्हिसा मिळवण्यासाठी लग्न केलं; राधिका आपटेचा खुलासा

लग्नसंस्थेवर विश्वास नसल्याचंही तिने सांगितलं.

लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं, त्यामुळेच मी बेनेडिक्टशी लग्न केलं, असा अजब खुलासा अभिनेत्री राधिका आपटेनं केला. त्याचप्रमाणे लग्नसंस्थेवर विश्वास नसल्याचंही तिने सांगितलं. अभिनेता विक्रांत मेस्सीने राधिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत विक्रांत व राधिकाने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

या मुलाखतीत विक्रांतने राधिकाला लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, “लग्न केल्यामुळे व्हिसा मिळणं सोपं होतं, हे समजल्यामुळे मी लग्न केलं. कारण आम्हा दोघांना एकत्र राहायचं होतं आणि मला व्हिसा मिळत नव्हता. माझा लग्नसंस्थेवर फारसा विश्वास नाही. पण लग्न केल्यामुळे मला व्हिसा सहज मिळाला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey87) on

पाहा व्हिडीओ : ‘मिले हो तुम हमको..’; स्वत:च्या लग्नात नेहा कक्करने गायलं गाणं, केला अफलातून डान्स

राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. सध्या ती लंडनमध्येच असून कामापासूनच तिने वर्षभर ब्रेक घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘रात अकेली है’ या चित्रपटात झळकली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत तिने स्क्रिन शेअर केला होता. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 10:43 am

Web Title: radhika apte on why she get married watch video ssv 92
Next Stories
1 लस्ट स्टोरीजमधील ‘व्हायब्रेटर सीन’वर कियाराने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..
2 Videos : ‘मिले हो तुम हमको..’; स्वत:च्या लग्नात नेहा कक्करने गायलं गाणं, केला अफलातून डान्स
3 अजय विसरला होता लग्नाची तारीख, अशी होती काजोलची प्रतिक्रिया
Just Now!
X