29 September 2020

News Flash

पैशांसाठी भीक मागावी लागत नाही, जाणून घ्या राधिका आपटेने का केले असे विधान

राधिकाने मीडियासह संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या हॉट लूक आणि अभिनयाने अनेकांना भूरळ घातली आहे. राधिकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. ती लवकरच ‘लिबर्टे: कॉल टू स्पाय’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासंबंधात राधिकाने मीडियासह संवाद साधला. दरम्यान तिने बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील फरक आधोरेखीत केला आहे.

‘डिएनए’सह झालेल्या एका मुलाखतीमध्ये राधिकाला हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये काम करण्यात काय फरक जाणवतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राधिकाने ‘तेथील लोक त्यांच्या कामाबाबत वक्तशीर आहेत आणि ते लोक वेळेत पैसे देतात. तेथे पैशांसाठी कोणाकडे सतत भीक मागावी लागत नाही’ असे उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : राधिका आपटेचा सेक्स सीन झाला व्हायरल

‘लिबर्टे: कॉल टू स्पाय’ या चित्रपटात राधिका ब्रिटीश गुप्तहेर नूर इनायत खानच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच राधिका या चित्रपटासाठी फार मेहनत घेत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे ‘द वेडिंग गेस्ट’ या बॉलिवूड चित्रपटात अभिनेता देव पटेलसह दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील त्यांचा सेक्स सीन लीक झाला होता. त्यावर राधिकाने या सीनमध्ये पुरुष कलाकार असूनही तिच्या नावे हा सीन लीक झाल्याने खंत व्यक्त केली होती.

राधिकाने ‘वाह! लाइफ हो तो ऐसी!’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर तिने हिंदी व्यक्तिरिक्त तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 4:40 pm

Web Title: radhika apte says that you dont have to beg them for money avb 95
Next Stories
1 सनी लिओनीने केला जुने कपडे घालण्याचा प्रयत्न आणि…
2 NDRF चा अभिमान वाटतो – अमिताभ बच्चन
3 दीपिकासाठी रणबीरची कुंकूऐवजी चटणीला पसंती?
Just Now!
X