‘सरस्वती’ मालिकेत नवे वळण

लोकप्रियतेच्या गणितात सध्या ज्या काही मालिका आघाडीवर आहेत त्यात ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सरस्वती’ मालिकेचाही समावेश आहे. सध्या या वाहिनीवरील मालिकांमध्ये ट्विस्टचं वादळ आलं आहे जणू.. कथेला वळण देण्यासाठी म्हणून आधीच ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेतून यशची म्हणजे संतोष जुवेकरची गच्छंती करण्यात आली. आता ‘सरस्वती’तही पुन्हा एकदा जोरदार वळण देण्यात येणार आहे. अर्थात, त्यासाठी कोणाची गच्छंती केलेली नाही. उलट आणखी एक व्यक्तिरेखा मालिकेत दाखल झाली आहे. गेले आठवडाभर भैरवकर कुटुंबात प्रवेश केलेली देविका ही राघवच्या भावासाठी रणजीतसाठी आणलेली सुनियोजित वधू आहे असा काहीसा प्रेक्षकांचा भ्रम करून देण्यात आला होता. प्रत्यक्षात, मालिकेत राघव आणि देविकाचंच शुभमंगल होणार आहे.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

‘सरस्वती’मध्ये याआधीच राघवचाही अपघाती मृत्यू दाखवून त्याला काही काळ मालिकेबाहेर ठेवण्यात आलं होतं. तो मालिकेत परतेपर्यंत राघवचा भाऊ रणजीतचा प्रवेश आणि राघव-रणजीत-सरस्वती असा त्रिकोण तयार करून झाला. राघव परतल्यानंतर त्याच्यात आणि सरस्वतीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. तो गुंता सोडवणारी सरस्वती कधी भैरवकरांच्या वाडय़ात तर कधी बाहेर अशा चकरा मारतेय. तिचं चकरा मारणं सार्थकी लागावं म्हणून खुद्द रणजीत या दोघांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहे. असं सगळं असतानाही सरस्वतीला राघवच्या आईच्या विद्युलच्या कटकारस्थानांना बळी पडावंच लागणार आहे. एकीकडे सरस्वतीबद्दलचे राघवच्या मनातील गैरसमज हळूहळू दूर होत असतानाच विद्युलने पुन्हा एकदा डाव खेळला आहे. मात्र सरस्वती आणि राघव एकमेकांपासून दूर जाणार नाहीत, या प्रेक्षकांच्या भाबडय़ा आशेला सुरूंग लागणार आहे.

राघव आणि देविकाचा विवाह होणार आहेच शिवाय, तो स्वत: सरस्वतीला पुढाकार घेऊन करून द्यावा लागणार आहे, असं धक्कादायक वळण कथेत आणण्यात आलं आहे. या वळणानंतर सरस्वती नेमकं काय करणार?, याबद्दलची उत्सुकताच मालिकेचं आकर्षण ठरणार आहे. देविकोच्या भूमिकेत अभिनेत्री जुई गडकरीचा मालिकेत आणि पर्यायाने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरही प्रवेश झाला आहे. गेली काही वर्ष जुई ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या दीर्घकाळ चाललेल्या मालिकेतील कल्याणीच्या भूमिकेत अडकली होती. आता मालिका संपली असल्याने जुई वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही. ‘सरस्वती’ची ही ट्विस्टवाली कथा दररोज संध्याकाळी सात वाजता पाहायला मिळेल.