काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी पाँडिचेरीला पोहोचले होते. एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या प्रचाकारासाठी राहुल गांधी तेथे पोहोचले आहेत. त्यावेळी त्यांनी कॉलेजच्या मुलांची भेट घेतली. दरम्यान तेथे उपस्थित असेलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना सर म्हणून आवाज दिला होता. त्यावर राहुल गांधींनी ‘माझे नाव सर नाही’ असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या हा व्हिडीओ अभिनेत्री स्वरा भास्करने शेअर केला आहे.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना सर म्हणून आवाज दिला होता. तेव्हा ते म्हणाले, ‘माझे नाव सर नाही. माझे नाव राहुल आहे. त्यामुळे मला राहुल या नावाने आवाज द्या. तुम्ही सर म्हणून तुमच्या शिक्षकांना आवाज द्या. मी राहुल आहे.’ राहुल गांधी यांचे उत्तर ऐकून विद्यार्थी आनंदी झाले.

दरम्यान राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ रिट्विट करत अभिनेत्री स्वरा भास्करने ‘स्वीट’ असे म्हटले आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- …म्हणून दिया मिर्झाने लग्नात कन्यादान करु दिलं नाही

अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती बिनधास्तपणे सामाजिक विषयावर तिचे मत मांडताना दिसते. बऱ्याचवेळा तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.