‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला सेलिब्रिटी म्हणजे राहुल महाजन. प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे राहुल कायमच चर्चेत राहिला आहे. यातच त्याने पुन्हा एकदा ‘बिग बॉस १४’ मध्ये चॅलेंजर म्हणून घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे ‘बिग बॉस १४’ मध्ये सहभागी झाल्यानंतर राहुलची पर्सनल लाइफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठने राहुलच्या लग्नाविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
‘बॉलिवूड लाइफ’च्या वृत्तानुसार, ‘राहुल महाजनने तीन नाही, तर चार लग्न केली आहेत, असा धक्कादायक खुलासा गहनाने केला आहे. राहुलने मुंबईत राहणाऱ्या मॉडेल भाविषा ‘डॉली’ देसाईसोबत लग्न केलं आहे. गहनाने केलेल्या या खुलाशानंतर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. मात्र, राहुलने याविषयी अद्यापही मौन बाळगलं आहे.
आणखी वाचा- “माझ्या पत्नीने धर्मपरिवर्तन केलंय”, राहुल महाजनचा खुलासा
“राहुलने मुंबईतील मॉडेल भाविषा डॉली देसाई हिच्यासोबत लग्न केलं आहे. भाविषा मूळची गोव्यातील असून ती गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहते. राहुलने भाविषासोबत लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर काही महिन्यातच त्याने तिला सोडलं. आता सध्या ते एकमेकांच्या संपर्कात नाही”, असं गहना म्हणाली.
आणखी वाचा- राहुल बिग बॉसच्या घरातून का बाहेर पडला?- गौहर खान
दरम्यान, राहुलने याविषयी मौन बाळगलं आहे. त्याने २०१८ मध्ये मॉडेल नताल्यासोबत लग्न केलं असून नताल्याने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे, असं राहुलने अलिकडेच झालेल्या भागात सांगितलं. राहुल आणि नताल्या इलिना या दोघांमध्ये जवळपास १८ वर्षांचं अंतर आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 2:45 pm