29 November 2020

News Flash

राहुल वैद्यने बिग बॉसच्या घरात उचलला घराणेशाही मुद्दा, कुमार सानू यांचा मुलगा संतापून म्हणाला

पाहा व्हिडीओ..

सध्या छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो बिग बॉसचे १४वे पर्व चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात भांडणे, प्रेम, फ्रेंडशीप हे सर्व पाहायला मिळत आहेत. दरम्यान आज दाखवण्यात येणाऱ्या नॉमिनेश प्रक्रियेमध्ये राहुल वैद्यने घराणेशाही हा मुद्दा उचलला आहे आणि त्यावरुन घरातील स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण सुरु झाल्याचे दिसत आहे.

आज बिग बॉसच्या घरात नॉमिनेची प्रक्रिया सुरु होणार आहे. दरम्यान राहुल वैद्य कुमार सानू यांचा मुलगा जान सानूला नॉमिनेट करताना घराणेशाही हा मुद्दा उचलताना दिसतो. ‘मी जानला नॉमिनेट करु इच्छितो. कारण मला घराणेशाहीचा प्रचंड राग येतो. बिग बॉसच्या घरात जितके स्पर्धक सहभागी झाले आहेत त्यांनी स्वत: मेहनत करुन घरात एण्ट्री मिळवली आहे. पण जानला घरात त्याच्या वडिलांमुळे एण्ट्री मिळाली आहे. त्याची स्वत:ची अशी ओळख नाही’ असे राहुल बोलताना दिसत आहे.

नुकताच कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर बिग बॉस १४मधील आजच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जान देखील राहुलला उत्तर देताना दिसत आहे. ‘माझे वडिल कुमार सानू आहेत. प्रत्येकजण माझ्याइतका नशीबवान नसतो. खासकरुन तूही नाही. माझ्या वडिलांविषयी काही बोलू नकोस’ असे चिडून जान बोलताना दिसत आहे.

राहुलच्या या वक्तव्यमुळे घरात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर राहुलच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. काही जण राहुलला पाठिंबा देत आहेत तर काहींनी त्यावर टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 4:43 pm

Web Title: rahul vaidya sparks on nepotism debate while nominating jan sanu in bigg boss 14 avb 95
Next Stories
1 ‘अरे ही पब्जीची कॉपी नाही ना?’; ‘फौजी’ गेमवर भन्नाट मिम्स व्हायरल
2 अक्षय कुमारने लॉन्च केला FAU-G चा टीझर; तुम्ही पाहिलात का?
3 लवकरच येणार ‘वीरे दी वेडिंग’चा सीक्वेल, ही असणार स्टाराकास्ट?