04 March 2021

News Flash

मुहूर्त ठरला! राहुल वैद्य ‘या’ महिन्यात बांधणार दिशासोबत लग्नगाठ

राहुलच्या आईने सांगितली महत्त्वाची माहिती

बिग बॉसच्या घरात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे राहुल वैद्य. टास्क खेळण्याच्या पद्धतीपासून ते घरातल्यांसोबत होत असलेल्या वादापर्यंत राहुल प्रत्येक कारणासाठी चर्चेत येत असतो.याच बिग बॉसच्या घरात राहुलने जाहीरपणे त्याच्या प्रेमाची कबुली दिली. तेव्हापासून राहुलच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियामध्ये रंगल्या आहेत. यामध्येच आता राहुलचं लग्न ठरलं असून त्याच्या आईने गीता वैद्य यांनी या लग्नाविषयी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

राहुल अभिनेत्री दिशा परमारला डेट करत असून बिग बॉसच्या घरात त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. दिशाच्या वाढदिवशी राहुलने त्याच्या टीशर्टवर माझ्याशी लग्न करशील का असं लिहून तिला भेट प्रपोज केलं होतं. त्यानंतर दिशाने राहुलला होकार दिला असून आता या जोडीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. यातच राहुलच्या आईन या दोघांच्या लग्नाचा महिना निश्चित झाल्याचं सांगितलं आहे.

वाचा : प्रभास करणार ‘या’ एनआरआय मुलीसोबत लग्न?

दिशा आणि राहूल जून महिन्यामध्ये लग्न करणार आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. राहुल बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर लग्नाची तारीख ठरवली जाणार आहे. मात्र, लग्नासाठी जून महिना निश्चित करण्यात आला आहे.

“बिग बॉसमधून राहुल बाहेर आला की लग्नाच्या साऱ्या गोष्टींना खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. त्या दोघांचं लग्न आहे त्यामुळे सगळं त्यांच्या मनाप्रमाणे व्हावं. आम्ही आम्ही लग्नाच्या लहान-मोठ्या तयारीला लागलो आहोत. दिशाच्या आई-वडिलांची भेट घेतली आहे. ते अत्यंत छान कुटुंब आहे”, असं राहुलच्या आईने गीता वैद्य यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 9:19 am

Web Title: rahul vaidya to marrya disha parmar in june ssj 93
Next Stories
1 प्रभास करणार ‘या’ एनआरआय मुलीसोबत लग्न?
2 ‘विनोद हाच आमचा ऑक्सिजन’
3 ‘फॅण्ड्री’नंतर सोमनाथ अवघडेचा नवा चित्रपट; पहिल्यांदाच दिसणार नव्या रुपात
Just Now!
X