08 July 2020

News Flash

ट्रेनची चेन खेचल्याप्रकरणी सनी देओल, करिश्मावर आरोप निश्चित

याप्रकरणाची पुढील सुनावणी २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.

सनी देओल, करिश्मा कपूर

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ट्रेनची चेन खेचल्याप्रकरणी अभिनेता व खासदार सनी देओल व अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यावर जयपूरच्या रेल्वे न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. १९९७मध्ये ‘बजरंग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ही घटना घडली होती. तसंच, परवागनीविना ट्रेनमध्ये चित्रीकरण करत रेल्वेच्या संपत्तीचा गैरवापर केल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे.

जयपूरजवळील फुलेरा रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेसमध्ये सनी देओल व करिश्मा ‘बजरंग’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत होते. चित्रीकरणादरम्यान ट्रेनची चेन खेचल्यानं गाडी २५ मिनिटं उशिराने पोहोचली. सनी देओल व करिश्मा यांच्यासोबतच सतीश शाह व टिनू आनंद यांच्यावरही आरोप निश्चिती करण्यात आली आहे.

याप्रकरणाची पुढील सुनावणी २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. सनी देओल आणि करिश्मा कपूर यांनी कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देत सत्र न्यायालयाच याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींना नोटीस जारी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 1:08 pm

Web Title: railway court frames charges against sunny deol and karisma kapoor in chain pulling case ssv 92
Next Stories
1 बिग बींनी ‘Selfie’ला दिले नवे हिंदी नाव
2 मोदींनी ‘मन बैरागी’ पाहाण्यास दिला नकार, कारण वाचून बसेल धक्का
3 महेश मांजरेकरांच्या मुलीवर मराठी कलाकारही फिदा, वाचा हे कमेंट्स
Just Now!
X