06 March 2021

News Flash

राज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीची विक्री नाही; हवेली मालकाने दिला नकार

राज कपूर यांची वडिलोपार्जित हवेली किस्सा ख्वानी बाजार भागात आहे

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता राज कपूर यांची पाकिस्तानामधील वडिलोपार्जित हवेली विकण्यास हवेली मालकाने नकार दिला आहे. ‘सरकारकडून ठरवून दिलेल्या किंमतीत ही हवेली विकता येणार नाही’, असं हवेली मालकाने सांगितलं आहे. राज कपूर यांची पाकिस्तानतील पेशावर शहराच्या मध्यवर्ती भागात वडिलोपार्जित हवेली आहे. ही हवेली खरेदी करुन त्याचं संग्रहालयात रुपांतर करण्याचा पाकिस्तानच्या पख्तुनख्वा सरकारचा मानस आहे. यासाठी त्यांनी २.३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, आता हवेली मालकाने ही हवेली विकण्यास नकार दिला आहे.

राज कपूर यांच्या हवेलीचे सध्या हाजी अली साबिर हे मालक असून त्यांनी ही हवेली कमी किंमतीत विकण्यास नकार दिला आहे. ‘राज कपूर यांची हवेली ही मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे ही हवेली खरेदी करण्यासाठी सरकारने जी रक्कम ठरवून दिली आहे. ती अत्यंत कमी आहे’, एका मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे.

वाचा : वरुणनंतर श्रद्धा कपूरला लागले लग्नाचे वेध; ‘या’ व्यक्तीशी बांधणार लग्नगाठ?

“ही हवेली ५१.७५ चौरस मीटर आहे. या हवेलीची किंमत सरकारने १.५० कोटी रुपये ठरवली आहे. ही किंमत सध्याच्या घडीला अत्यंत कमी आहे. त्यामुळे ही हवेली विकणं शक्य नाही”, असं हाजी अली साबिर यांनी म्हटलं आहे.

वाचा : हद्द झाली! कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र

दरम्यान, ‘कपूर हवेली’ नावाने ओळखली जाणारी राज कपूर यांची वडिलोपार्जित हवेली किस्सा ख्वानी बाजार भागात आहे. त्यांचे आजोबा दिवाण बसेश्वरनाथ कपूर यांनी १९१८ ते १९२२ दरम्यान ती बांधली होती. राज कपूर व त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म या इमारतीत झाला. प्रांतिक सरकारने हे घर राष्ट्रीय वारसा स्थळ जाहीर केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2021 2:13 pm

Web Title: raj kapoors mansion in pakistan will not be sold ssj 93
Next Stories
1 हद्द झाली! कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र
2 म्हणून ट्रेडमिलवर अक्षय कुमार चालला चक्क २१ किमी? जाणून घ्या कारण
3 शरीरावरील ‘त्या’ व्रणांमुळे मलायका झाली ट्रोल
Just Now!
X