आगामी ‘२.०’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारचा लूक प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘थलायवा’ रजनीकांत यांचा आणखी एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रजनीकांत या पोस्टरमध्ये ‘इलेक्ट्रोड्स’ने तयार केलेल्या सूटमध्ये दिसून येत आहेत. चिट्टी रोबोटच्या या लूकमध्ये त्यांनी घातलेल्या शर्टवरही ‘इलेक्ट्रॉनिक चीप’सारखी डिझाइन पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या एका गाण्यातील हा लूक असून यात रजनीकांत आणि अॅमी जॅकसन यांना चित्रीत केल्याचं म्हटलं जात आहे.
‘२.०’ या चित्रटपसृष्टीतील सर्वाधिक महागड्या चित्रपटाचे बरेच पोस्टर आतापर्यंत प्रदर्शित करण्यात आले. गेल्याच आठवड्यात दुबईमध्ये या चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा दिमाखदार कार्यक्रम पार पडला होता. निर्मात्यांकडून या कार्यक्रमासाठी जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
A new still of @superstarrajini from #2Point0 pic.twitter.com/U2HG5uNcq7
— Ramesh Bala (@rameshlaus) November 4, 2017
वाचा : ट्विंकलच्या माफीनाम्यावरही मल्लिकाची खोचक शब्दांत टीका
एकंदरीत चित्रपटाचे भव्य ऑडिओ लाँच आणि पोस्टर्स पाहता रजनीकांत, अक्षयचा हा चित्रपट सर्वार्थाने चर्चेचा विषय ठरत आहे. रजनीकांत आणि अक्षय या दोन मोठ्या सुपरस्टार्सना एकत्र आणणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री अॅमी जॅकसनचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. ‘२.०’ पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 4, 2017 9:01 pm