News Flash

कोणी घर देता का घर..? राजकुमार राव नवीन घराच्या शोधात; नेटकरी म्हणतात…

जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आता त्याने कोणता फोटो किंवा व्हिडीओ नाही तर एक ट्वीट करत सगळ्यांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे.

राजकुमार रावने ट्विटरवर ट्वीट करत चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. “तुम्हाला नवीन शहरात नवीन घर घेण्याची इच्छा असेल, तर काय केले पाहिजे. काही कल्पना आहे का?” , असा प्रश्न राजकुमारने विचारला आहे. त्याच्या या प्रश्नावर नेटकऱ्यांनी त्याला भन्नाट सल्ले दिले आहेत.


” नवीन शहरात जाऊन नवीन घर पाहून घेतल पाहिजे,” असं एका युजरने म्हटलं आहे. तर, ” घर शोधा आणि काय”, असं अन्य एक नेटकरी म्हणाला आहे. यात तिसरा नेटकरी म्हणाला की, “मनोज वाजपेयी आणि तुम्ही एकत्र बोलून घ्या.”

आता या ट्वीटला अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या ट्वीटशी जोडण्यात येत आहे. मनोज वाजपेयी यांनी राजकुमार हे ट्वीट करण्याच्या काही काळ आधी एक ट्वीट केलं होतं की, ” माझ्या बांद्रा येथील घरासाठी खरेदीदार शोधत आहे. कोणी असेल तर सांगा.” अशा आशयाचं ट्वीट मनोज वाजपेयी यांनी केलं होतं. या दोघांचे हे ट्वीट पाहिले तर हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण मनोज वाजपेयी यांची आगामी वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’ याच्या प्रमोशनसाठी हा पब्लिसिटी स्टंट असू शकतो असं म्हटलं जात आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 11:27 am

Web Title: rajkumar rao is in search of new home ask on twitter dcp 98
Next Stories
1 कियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय? लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल
2 वरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली ‘ही’ गोष्ट
3 एस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार
Just Now!
X