News Flash

‘बोस डेड ऑर अलाइव्ह’

नेताजींचे आयुष्य फार रहस्यमय होते.

अभिनेता राजकुमार राव दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या वेब सीरिज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारणार आहे.

वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवणारा अभिनेता राजकुमार राव दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या वेब सीरिजमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारणार आहे. ‘बोस डेड ऑर अलाइव्ह’ या वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. या टीझरमधील राजकुमारचा लूक पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल हे नक्की.

या टीझरमध्ये अंधारात सिगरेट पेटवताना एक दृश्य असतं. त्यानंतर हळूहळू तो चेहरा उजेडात येताना दाखवलाय. उजेडात आल्यानंतरचा राजकुमारचा लूक थक्क करणारा आहे. बॅकग्राऊंडमधील म्युझिकमध्येही रहस्य, गूढ याची अनुभूती येते.

नेताजींचे आयुष्य हे रहस्यमय होते. यासाठी सरकारकडून नुकत्याच उघड करण्यात आलेल्या गोपनीय कागदपत्रांमधून त्यांच्या आयुष्यातील घटनांचा संदर्भ घेण्यात आला आहे. तसेच, स्वातंत्र्य चळवळीतून ते अचानकपणे गायब झाले होते याचाही उल्लेख यात करण्यात आलाय. त्यामुळे या शोमध्ये नेताजींबद्दलच्या काही दुर्मिळ गोष्टी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

वाचा : ‘या’ कारणामुळे झाला सुशांतचा पहिला ब्रेकअप

व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणण्यासाठी राजकुमार नेहमीच वेगवेगळे प्रयत्न करत असतो. नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भूमिका साकारण्यासाठीही त्याने खूप मेहनत घेतलीये. या भूमिकेसाठी त्याने तब्बल ११ किलो वजन वाढवले आहे. येत्या १८ ऑगस्टला वेब सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 5:00 pm

Web Title: rajkumar rao web series bose dead or alive teaser video
Next Stories
1 चिमुकल्या चाहतीसोबतचा ऐश्वर्याचा हा व्हिडिओ पाहिलात का?
2 नवोदित गायकांसाठी ९१.१ एफएमची ‘रेडिओ सिटी सुपर सिंगर’ स्पर्धा
3 एकता कपूरमुळे पहलाज निहलानी यांना सोडावं लागलं अध्यक्षपद?
Just Now!
X