News Flash

Photo : अनुराग बासूच्या चित्रपटात दंगल गर्ल-राजकुमारची जोडी

राजकुमार राव आणि फातिमा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

राजकुमार राव आणि फातिमा सना शेख

दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटामध्ये ती झळकली होती. त्यानंतर आता लवकरच ती अनुराग बासूच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव स्क्रीन शेअर करणार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या फातिमाने ट्विटरवर एक फोटो शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली आहे.

तगडी स्टारकास्ट असूनही ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली. या चित्रपटाच्या अपयशानंतर फातिमा पुन्हा एकदा नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली असून ती अनुराग बासूच्या चित्रपटात झळकणार असल्याचं तिने स्वत: सांगितलं आहे. फातिमाप्रमाणेच राजकुमार रावनेदेखील एक फोटो शेअर करत ही न्युज कम्फर्म असल्याचं म्हटलं आहे.

 

‘नव्या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. मात्र तोपर्यंत ही एक लहानशी झलक’, असं कॅप्शन राजकुमारने शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. राजकुमार आणि फातिमा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये हे दोघंही एका नदीच्या किनाऱ्यावर उभे असून त्यांचा चेहरा मात्र दाखविण्यात आला नाही. या फोटोत राजकुमार राव हा मिथून चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील आयकॉनिक स्टेप करताना दिसत आहे. तसंच फातिमा आणि राजकुमार ८० च्या दशकातील वेशभूषेत दिसत आहेत.

 

 

‘प्रेमाने साद घालाल तर नक्कीच एकदा वळू पाहू’ असं कॅप्शन फातिमाने दिलं आहे. फातिमा सध्या लोकप्रिय ठरत असून बॉलिवूडमधील तिचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी ती झळकलेल्या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने अभिनेता आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 1:35 pm

Web Title: rajkummar rao and fatima sana shaikh in next film
Next Stories
1 ‘मी सुद्धा राजपूत! एकालाही सोडणार नाही’; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर
2 त्या चर्चा निव्वळ अफवा; ‘सूर्यवंशी’बद्दल रोहित शेट्टीचा नवा खुलासा
3 Photo : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार ‘ही’ सौंदर्यवती
Just Now!
X