दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव आणि त्याची पत्नीला दहा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांवर पाच कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भातील याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे.
राजपाल आणि त्याच्या पत्नीवर पाच कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. पण, ठराविक वेळेत पैसे परत देऊ न शकल्याने त्यांना दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी राजपालने मुरली प्रोजेक्टेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून २०१० साली पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु, हे पैसे तो परत देण्यास असमर्थ ठरला. याअगोदर राजपालने न्यायालयात हे पैसे व्याजासहीत परत करण्याचे आश्वासन दिलं होतं. परंतु, पैसे परत दिले नाहीत.