21 September 2020

News Flash

पाहा: ‘राजवाडे अँड सन्स’चे ‘डिजीटल पोस्टर’

कोणताही सिनेमा म्हटला की, पहिले डोळ्यासमोर येते त्या सिनेमाचे पोस्टर. त्यावरूनच सिनेमा कसा असेल याचा अंदाज रसिक बांधतात.

| August 27, 2015 08:00 am

कोणताही सिनेमा म्हटला की, पहिले डोळ्यासमोर येते त्या सिनेमाचे पोस्टर. त्यावरूनच सिनेमा कसा असेल याचा अंदाज रसिक बांधतात. हे पोस्टरच सिनेमाविषयीचा पहिला संवाद साधते आणि रसिकांच्या मनात एक घर करते. काळ्या फळ्यावर खडूने चित्रपटाचे नाव लिहिण्यापासून सुरू झालेला हा ट्रेंड काळाबरोबर आणि पिढी बरोबर बदलत गेला, हाताने रंगवलेले पोस्टर, प्रिंटेड पोस्टर, एवढेच नव्हे तर थ्रीडी पोस्टर्स… आणि आता ‘राजवाडे अँड सन्स’ या नावातच पुढची पिढी निदर्शित करणार्‍या या चित्रपटाच्या माध्यमातून ‘डिजीटल पोस्टर’पर्यंत आला आहे. ‘डिजीटल पोस्टर’ची आगळी वेगळी संकल्पना घेऊन येणारा हा सिनेमा दि. १६ ऑक्टोबरपासून तुमच्या जवळ्या ‘मुव्ही स्क्रीन्स’वर येत आहे.

पोस्टर्स केवळ चित्रपटाची कहाणी सांगत नाही तर यांचा बदलता ट्रेंड बदलत्या पिढीबरोबर पुढे जाणारे विज्ञान-तंत्रज्ञान यांचीही कहाणी सांगतात. म्हणूनच तर थ्रीडी पोस्टर्स आणि आता ‘राजवाडे अँड सन्स’ घेऊन येत असलेले ‘डिजीटल पोस्टर’ आकर्षणचा आणि कुतूहलाचा विषय ठरले आहे. मराठी चित्रपटाची कथा, आशय हाच मराठी रसिकांना विशेष आकर्षित करून घेतो. त्यामुळे मराठी रसिकांना जवळचा, आपल्याशी निगडीत वाटेल असाच विषय घेऊन हा चित्रपट येत आहे. चित्रपट लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भावेल असे सगळेच पैलू यात बघायला मिळतात. याचा पहिलाच नमूना घेऊन चित्रपटाचे पहिले ‘डिजीटल पोस्टर’ रसिकांच्या भेटीस येत आहे. अन्य सर्वच चित्रपटांप्रमाणे याही पोस्टर मध्ये चित्रपटातील बहुतांश पात्र आपल्याला भेटतात, मात्र जरा ‘हटके’. आपल्या कुटुंबाची गोष्ट सांगत एक एक पात्र या पोस्टरवर अवतरत आणि पूर्ण होते ती ‘फॅमिली फ्रेम’.
अय्या, हॅपी जर्नी, रेस्टॉरंट, गंधसारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘राजवाडे अँड सन्स’ चित्रपटाद्वारे एकाच चित्रपटात अनेक प्रसिध्द कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. यात प्रमुख भूमिकेत अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी हे कलाकार दिसतात, तर सतीश आळेकर, ज्योती सुभाष, सिध्दार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव, पुर्णिमा मनोहर, राहुल मेहंदळे, अमित्रीयन पाटील, सुहासिनी धडफळे यांच्या अभिनयाने वेगळीच मजा आणली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सचिन कुंडलकर यांचीच असून वाय. एम. देवस्थळी व कॅफे कॅमेरा यांची निर्मिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 8:00 am

Web Title: rajwade and sons motion poster
टॅग Bollywood
Next Stories
1 करीनाने नाकारलेला दिग्दर्शक!
2 मान्यवरांच्या उपस्थितीत ‘माझा सन्मान’ सोहळा
3 कुणालचा आगामी ‘कौन कितने पानी मे है’ शुक्रवारी प्रदर्शित
Just Now!
X