News Flash

‘तारक मेहता..’मध्ये ‘या’ प्रसिद्ध कलाकाराची एण्ट्री; १२ वर्षांपूर्वीच मिळाली होती ऑफर

तारक मेहताच्या बॉसची भूमिका साकारणार आहेत.

गेल्या दशकापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत आता एका नव्या कलाकाराची एण्ट्री होणार आहे. हा नवा कलाकार आहे प्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी. मालिकेत राकेश बेदी हे तारक मेहताच्या बॉसची भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे १२ वर्षांपूर्वीच त्यांना या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं होतं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी बोलताना ते म्हणाले, “होय, १४ ऑगस्टपासून मी मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. माझी भूमिका फारच रंजक आहे. १२ वर्षांपूर्वी जेव्हा ही मालिका सुरू झाली तेव्हा मला या भूमिकेविषयी सांगण्यात आलं होतं. मी तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढाच्या बॉसची भूमिका साकारत आहे. पुस्तकातील मूळ कथेत या भूमिकेचा उल्लेख आहे. ही भूमिका फार महत्त्वाची आहे. पण त्यावेळी या भूमिकेला फारसं महत्त्व दिलं गेलं नव्हतं आणि तेव्हा कथानकात जेठालाल मुख्य व्यक्तीरेखा होती.”

राकेश बेदी यांनी याआधी ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी ते ‘श्रीमान श्रीमती’, ‘जबान संभालके’ यांसारख्या बऱ्याच कॉमेडी शो आणि मालिकेत झळकले होते. ‘तारक मेहता..’ या मालिकेने नुकतीच १२ वर्षे आणि तीन हजार एपिसोड्स पूर्ण केली आहेत. इतक्या वर्षांनंतर आजही या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 8:12 pm

Web Title: rakesh bedi joins the cast of taarak mehta ka ooltah chashmah ssv 92
Next Stories
1 असे तयार झाले ‘चक दे इंडिया’चे गाणे; सलीम-सुलेमान यांनी सांगितला किस्सा
2 नारायण राणे यांचा गौप्यस्फोट; “सुशांत सिंहची हत्याच, पण…”
3 अभिनयानंतर आर. माधवनचं दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण; नम्बी नारायण यांचा उलगडणार जीवनप्रवास
Just Now!
X