News Flash

‘काबिल’ निर्मात्याने ‘रईस’च्या कमाईबद्दल अशी दिली प्रतिक्रिया

'सारा जमाना सिनेमा का दिवाना' अशा हटके अंदाजात व्यक्त केला आनंद

'रईस' आणि 'काबिल'च्या बॉक्स ऑफिसवरील कमाईवर राकेश रोशन संतुष्च

बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर ‘काबिल’ आणि ‘रईस’ची टक्कर टाळण्यामध्ये अपयशी ठरलेले ‘काबिल’ चित्रपटाचे निर्माते राकेश रोशन सध्या आनंदी दिसत आहेत. ‘काबिल’च्या तुलनेत ‘रईस’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. तर ‘काबिल’ हा चित्रपटही प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. शाहरुख खानचा ‘रईस’ आणि ह्रतिक रोशनचा ‘काबिल’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. ‘काबिल’च्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाल्यानंतर शाहरुखने आपला चित्रपटही त्याच तारखेला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. खान आणि रोशन चित्रपटाच्या एकत्र प्रदर्शनामुळे नाराज झालेले राकेश रोशन यांनी त्यावेळी नाराजी देखील व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आताच्या घडीला राकेश रोशन आनंदीत दिसत आहेत.  दोन्ही चित्रपटाला मिळणाऱ्या यशामुळे अनोख्या अंदाजात आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘सारा जमाना सिनेमा का दिवाना’ अशा हटके अंदाजात त्यांनी आपण संतुष्ट असल्याची भावना व्यक्त केली.

बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर रईस चित्रपटाने आतापर्यंत जवळ जवळ १०३ कोटींचा गल्ला जमविला आहे. यावर  काबिलचे निर्माता राकेश रोशन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. काबिल चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल राकेश रोशन यांनी आभार मानले आहेत. काबिल चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून दुसऱ्या आठवड्यापासून हा चित्रपट आणखी काही चित्रपटगृहात दाखल होणार असल्याची माहिती देखील रोशन यांनी यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Next Stories
1 पुण्यातील त्या सौंदर्यवती तरुणीमुळे शाहरुखचा सेल्फी व्हायरल
2 बॉलिवूडच्या खिलाडीने दिला मधुमेह टाळण्याचा सल्ला
3 नर्गिस उदयला पुन्हा भाव देणार का?
Just Now!
X