News Flash

हृतिक-सुझान पुन्हा एकत्र राहण्याबाबत राकेश रोशन म्हणतात..

लॉकडाउनच्या काळात मुलांसोबत राहण्यासाठी सुझान हृतिक रोशनच्या घरी परतली.

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी वगळता घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. या कठीण काळात आपल्या मुलांसोबत राहण्यासाठी सुझान खान अभिनेता हृतिक रोशनच्या घरी परतली. घटस्फोटानंतर हे दोघं एकत्र राहत असल्याच्या चर्चांना त्यामुळे उधाण आलं होतं. यावर आता हृतिकचे वडील व अभिनेता, दिग्दर्शक राकेश रोशन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन म्हणाले, ‘अशा कठीण परिस्थितीत सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे, एकमेकांची साथ देणं गरजेचं आहे.’ सुझान घरी परतल्यानंतर हृतिकनेही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली होती. ‘लॉकडाउनसारख्या काळात आपल्या मुलांपासून वेगळं राहणं याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. सुझानने असा परिस्थितीत योग्य निर्णय घेतला आणि माझ्या घरी परतली. पालक म्हणून जबाबदारी योग्यरित्या पार पडण्यासाठी तुझे आभार,’ असं त्याने लिहिलं होतं.

आणखी वाचा : महिलांसाठी ‘देसी गर्ल’ने पुढे केला मदतीचा हात; देणार १ लाख डॉलर्स

हृतिक व सुझान यांनी २००० मध्ये लग्नगाठ बांधली. १३ वर्षांच्या संसारानंतर २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना रेहान आणि रिधान अशी दोन मुलं आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 11:14 am

Web Title: rakesh roshan reacts to sussanne khan decision to move in with hrithik during lockdown ssv 92
Next Stories
1 Coronavirus : महिलांसाठी ‘देसी गर्ल’ने पुढे केला मदतीचा हात; देणार १ लाख डॉलर्स
2 Coronavirus : ‘स्टार वॉर्स’ फेम अभिनेता अँड्र्यू जॅकचा करोना व्हायरसमुळे मृत्यू
3 ‘यापुढे अपमानास्पद कमेंट केली तर…’; ऋषी कपूर ट्रोलर्सवर भडकले
Just Now!
X