25 October 2020

News Flash

Video : ‘सुशांत माझ्या पोटी पुनर्जन्म घेणार’; राखी सावंत पुन्हा बरळली

अजब वक्तव्य करुन राखी पुन्हा चर्चेत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या सर्वच स्तरावर एकच चर्चा सुरु आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही घराणेशाहीवरुन नवा वाद सुरु झाला आहे. यामध्येच अभिनेत्री राखी सावंतने एक अजब वक्तव्य करुन अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अजब वक्तव्य करुन सतत चर्चेत येणारी राखी, ‘ड्रामा क्वीन’ या नावाने ओळखली जाते. विशेष म्हणजे यावेळीदेखील तिने असंच एक वक्तव्य करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सुशांत सिंह राजपूत माझ्या स्वप्नात आला होता असं तिने म्हटलं आहे. राखीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन हे वक्तव्य केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

“मी रात्री झोपले असताना अचानक माझ्या स्वप्नात सुशांत आला आणि त्याने मी तुझ्या पोटी पुनर्जन्म घेणार आहे, असं सांगितलं. मात्र त्याच्या या वाक्याचा अर्थ मला समजला नाही. त्यामुळे हे कसं काय शक्य आहे असा प्रतिप्रश्न मी त्याला विचारला. त्यावर तू लग्न कर त्यानंतर मी तुझ्या पोटी जन्म घेईन असं त्याने सांगितल्याचं”, राखीने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, राखीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.राखीला परिस्थितीचं भान नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर कलाविश्वात विविध चर्चा रंगत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 1:46 pm

Web Title: rakhi sawant says sushant singh rajput came in her dreams and told about his reincarnation through her womb ssj 93
Next Stories
1 पांड्याच्या पुश-अप्सवर बॉलिवूड अभिनेत्री फिदा; नताशाने केली ‘ही’ कमेंट
2 “माझ्याशी पंगा घेतलास तर..”; सोनू निगमचा भूषण कुमारला इशारा
3 ‘रिकामं डोकं सैतानाचं घर’; ट्रोलर्सना अरबाज खानचं उत्तर
Just Now!
X