09 July 2020

News Flash

फोटोचं फिमेल व्हर्जन व्हायरल झाल्यावर सुनील लहरी म्हणतात….

त्यांनी स्वत: हा फोटो शेअर केला आहे.

लॉकडाउनच्या काळात ८० आणि ९०च्या दशकातील मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा दाखवण्यात आल्या होत्या. दूरदर्शनवर दाखवण्यात आलेल्या मालिकांपैकी ‘रामायण’ या मालिकेच्या विशेष चर्चा रंगल्या होत्या. या मालिकेने सर्वांचीच मने जिंकली. तसेच मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मण हे पात्र साकारणारे कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले. आता सोशल मीडियावर रामायणात लक्ष्मण हे पात्र साकारणारे सुनील लहरी त्यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेत आहेत.

सुनील लहरी यांच्या चाहत्यांनी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या फेस अॅपमध्ये त्यांचा फोटो तयार करुन शेअर केला आहे. या अॅपमध्ये चेहरा बदलून स्त्रियांचे पुरूषी रूप किंवा पुरूषांचा महिला वेष कसा दिसेल हे दाखवण्यात येते. सुनील लहरींच्या चाहत्यांनी त्यांचा महिला वेषातील फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सुनील लहरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट महिला रुपात ते कसे दिसतील याचा फोटो शेअर केला आहे. सुनील लहरी यांनी फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 5:38 pm

Web Title: ramayana lakshaman sunil lahri gets new look as girl fans faceapp see pics avb 95
Next Stories
1 “…तर सुशांतने भारतासाठी ऑस्कर जिंकला असता”
2 ‘सा रे ग म’मधला अनुभव सांगतायेत बेला शेंडे
3 ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’मधून जॅक स्पॅरोला केलं बाहेर; ही अभिनेत्री साकारणार मुख्य व्यक्तिरेखा
Just Now!
X