01 October 2020

News Flash

राणा-मिहीकाचा हळदीचा कार्यक्रम; ‘या’ दिवशी पार पडणार लग्नसोहळा

हैदराबादमधल्या रामानायडू स्टुडिओत पार पडणार आहे.

‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामधला भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा डग्गुबती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या ८ ऑगस्ट रोजी राणा व मिहीका बजाज आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. बुधवारी राणा – मिहीकाचा हळदीचा कार्यक्रम पार पडला आणि गुरुवारी मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. राणाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कार्यक्रमातला फोटो पोस्ट केला आहे.

राणाने हळदीच्या कार्यक्रमासाठी पांढरा शर्ट आणि धोती परिधान केली. तर मिहीका पिवळ्या आणि पांढऱ्या लेंहग्यामध्ये दिसली. ‘आणि आता हास्यात हे आयुष्य पुढे सरकणार आहे. धन्यवाद’, असं कॅप्शन राणाने या फोटोला दिलंय. सोशल मीडियावर चाहत्यांकडून व सेलिब्रिटींकडून राणा व मिहीकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

And life moves fwd in smiles 🙂 Thank you ❤️

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

हा लग्नसोहळा हैदराबादमधल्या रामानायडू स्टुडिओत पार पडणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या विवाहसोहळ्याला मोजके लोक उपस्थित राहणार असून सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे.

मिहीका इंटिरिअर डिझायनर असून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीण आहे. मिहीकाचे वडिल हैदराबादमधील नामांकित सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. तर आई ज्वेलरी डिझायनर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 8:51 pm

Web Title: rana daggubati and miheeka bajaj are all smiles in this adorable pic from haldi ceremony ssv 92
Next Stories
1 कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक
2 आत्महत्येच्या एक दिवस आधी सुशांतने केली ‘ही’ गोष्ट
3 नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना करोनाची बाधा, लीलावती रुग्णालयात दाखल
Just Now!
X