News Flash

मिहिका बद्दल कळताच अशी होती राणाच्या घरातल्यांची प्रतिक्रिया

त्याने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘बाहुबली’ चित्रपटात भल्लालदेव ही भूमिका साकारणारा दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबती चर्चेत आहे. या चर्चा त्याने सोशल मीडियाद्वारे मिहिका बजाजने लग्नासाठी होकार दिल्याचे सांगितल्यामुळे सुरु झाल्या. राणाने लॉकडाउनमध्येच काही निवड लोकांच्या उपस्थितीत हैद्राबाद येथे साखरपूडा केला आहे. पण जेव्हा राणाने मिहिकाशी लग्न करण्याचे ठरवले तेव्हा त्याच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

नुकताच राणाने इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्यांच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती हे सांगितले आहे. ‘मी मिहिकाशी लग्न करण्याचे ठरवले आहे हे ऐकून माझे कुटुंबीय खूप आनंदी होते. त्यांना सर्वांना हे ऐकून खूप आनंद झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून मी मिहिकाशी लग्न करावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे आता सर्वजण आनंदी आहेत’ असे राणाने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

And it’s official!!

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

त्यानंतर राणाला त्याच्या लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने ‘त्यावेळी देशात असलेल्या परिस्थितीचा विचार करुन मी लग्नाचे नियोजन करेन’ असे म्हटले आहे.

कोण आहे मिहिका बजाज?
मिहिकाची स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. या कंपनीचे नाव ‘ड्यू ड्रॉप डिझाइन स्टुडिओ’ असे असून २०१७मध्ये तिने ती स्थापित केली. मिहिकाची आई बंटी बजाज या दागिन्यांच्या व्यवसायातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्या एक प्रसिद्ध वेडिंग डेकॉर प्लॅनरसुद्धा होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 7:36 pm

Web Title: rana daggubati on how his family reacted to knowing about miheeka bajaj avb 95
Next Stories
1 “सलमानला वाटतं सगळेच त्याच्याविरोधात कट रचत आहेत”; हृतिकने केली होती टीका
2 अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
3 अभिनेत्रीवर केला जातोय लहान मुलांच्या तस्करीचा आरोप; कारण…
Just Now!
X