News Flash

कतरिनावरून रणबीर करीनाची कपूर कोंडी!

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करन’चे नवे पर्व पहिल्या भागापासूनच बॉलिवूडची रहस्ये एकापाठोपाठ एक उघड करणारे ठरले आहे.

| December 4, 2013 09:31 am

कतरिनावरून रणबीर करीनाची कपूर कोंडी!

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करन’चे नवे पर्व पहिल्या भागापासूनच बॉलिवूडची रहस्ये एकापाठोपाठ एक उघड करणारे ठरले आहे. या पर्वाची सुरुवातच सलमान खानने झाली आहे. आता दुसऱ्या भागाची जाहिरातही टीव्हीवर झळकली असून त्यात करीना आणि रणबीर कपूर ही दोन्ही भावंडे करणसमोर आहेत. मात्र, हा भाग करीनाने गाजवला आहे. तिने करणच्या मदतीने रणबीर कतरिनाच्या प्रेमात आहे हे वदवून घेण्याचा भरपूर प्रयत्न या भागात केला आहे. आणि रणबीरने नेहमीप्रमाणे बचावाचा पवित्रा घेतला असला तरी करीनाने मात्र कतरिनाचा उल्लेख ‘वहिनी’ असा करत त्याचे अफेअर लग्नाच्या विचारापर्यंत पोहोचले असल्याचे जाहीर करून टाकले आहे.
‘कॉफी विथ करन’च्या दुसऱ्या भागात येताना करीना कपूर खान झाली असल्याने तिच्याकडे लपवाछपवी करण्यासारखे फारसे काही उरलेले नाही. मात्र, रणबीर आणि कतरिनाचे अफेअर हा सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय असल्याने तिने आणि करीनाने यावरून त्याला चांगलेच कोंडीत पकडले आहे. रणबीर प्रेमाची कबुली देईल की नाही हे माहीत नाही. पण, करीनाने मात्र तुझ्या लग्नात मला एकटीला ‘शीला की जवानी’ आणि ‘चिकनी चमेली’ या कतरिनाच्याच गाण्यांवर नृत्य करायचे आहे, असे शोमध्ये सांगून टाकले. एवढेच नाही तर करीनाने रणबीरला ‘तुझे कतरिनावर प्रेम आहे की नाही?’, असा थेट सवालही केला आहे. करीना आणि करणच्या प्रश्नांना काय उत्तरे द्यायची हे न कळलेल्या रणबीरने इथेही ‘माझे करीनावर प्रेम आहे’, असे सांगून प्रश्नाला बगल दिली. पण, त्यावरही या करीनात तुम्ही एक  ‘टी’ जोडून टाका, असे सांगत करीनाने रणबीरची पुंगी वाजवली.
‘समलिंगी संबंध ठेवायचे तर कतरिनाशी ठेवेन’
करणने यावेळी करीनाला आणखी एक प्रश्न विचारला. ‘तुला समलिंगी संबंध ठेवायचे झाले तर तुझा जोडीदार कोण असेल?’ यावरही करीनाने अशावेळी मी माझ्या भावजयीबरोबर जास्त मोकळेपणे वागू शकेन. त्यामुळे इथेही मी कतरिना कै फचेच नाव घेईन, असे उत्तर देत कतरिनाचा थेट उल्लेख ‘भावजय’ असा केला.  क रणच्या या कॉफीमुळे रणबीरच्या कपातील वादळे करीनाने उघड केली आहेत. यावर रणबीरची सगळी उत्तरे काय हे पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहणार. करणची कॉफी यावेळीही छोटा पडदा गाजवणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2013 9:31 am

Web Title: ranbir and kareena in koffee with karan
टॅग : Ranbir Kapoor
Next Stories
1 कतरिना चौथ्यांदा ठरली ‘वर्ल्डस् सेक्सिएस्ट एशियन वुमन’
2 मायकेल जॅक्सनने वापरलेल्या वस्तूंचा लिलाव
3 जावेद अख्तर रुग्णालयात
Just Now!
X