News Flash

दीपिका- रणबीर कपूर पुन्हा येणार एकत्र?

दीपिका आणि रणबीरची जोडी रुपेरी पडद्यावरची हिट जोडी समजली जाते. ब्रेकअप नंतरही तिनं रणबीर कपूर सोबत काम केलं.

दीपिका- रणबीर कपूर पुन्हा येणार एकत्र?
लग्नानंतरही दीपिका रणबीरसोबत काम करणार असल्याचं समजत आहे.

कधी काळी दीपिका आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधलं सर्वात लाडकं जोडपं होतं. पण, दीपिका आणि रणबीरच्या प्रेमाची गाडी मात्र पुढे गेली नाही. रणबीरसोबत प्रेमभंग झाल्यानं दीपिकाही काही महिने नैराश्येत गेली. रणबीरसोबत तिचं प्रेमाचं नातं संपलं असलं तरी प्रोफेशनलिझम दाखवत तिनं ब्रेकअपनंतरही रणबीरसोबत काम करण्याची तयारी दाखवली. ब्रेकअपनंतरही एकत्र काम करणारी दीपिका-रणबीरची ही सध्याच्या घडीची एकमेव जोडी असेल. पण लग्नानंतरही दीपिका रणबीरसोबत काम करणार असल्याचं समजत आहे. लवकर ते दोघंही एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे.

‘प्यार का पंचनामा’ फेम दिग्दर्शक लव रंजन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.  या चित्रपटात रणबीर, दीपिकासोबतच अजय देवगनची प्रमुख भूमिका असणार आहे. दीपिका आणि रणबीरची जोडी रुपेरी पडद्यावरची हिट जोडी समजली जाते. दोघांनीही ‘ये जवानी है दिवानी’, ‘तमाशा’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. रणबीरनं चित्रपटात आघाडीच्या अभिनेत्रीची निवड करावी असा हट्ट लव रंजनकडे धरला होता. लव रंजनच्या सगळ्याच चित्रपटात नुसरत भरुचा ही प्रमुख भूमिकेत असते त्यामुळे साहजिकच नव्या चित्रपटात लव तिलाच संधी देणार असं म्हटलं जात होतं. मात्र रणबीरच्या हट्टापायी लवनं आपली कथित प्रेयसी नुसरतला डच्चू दिल्याचं म्हटलं जात आहे. नुसरत लवला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

दीपिका- रणबीरचा चित्रपट हा २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं समजत आहे. २०१९ पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. दीपिका ही पुढील महिन्यात अभिनेता रणवीर सिंग सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. १४ आणि १५ नोव्हेंबरला त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2018 12:03 pm

Web Title: ranbir kapoor and deepika padukone will reportedly work together in new movie
Next Stories
1 #MeToo : माझ्यावरही झाला होता बलात्काराचा प्रयत्न, आलियाच्या आईचा खळबळजनक खुलासा
2 प्रियांकासाठी निकनं खरेदी केलं तब्बल ४७ कोटींचं घर
3 MeToo: सुशांतसिंह राजपूतला दिलासा, अभिनेत्रीने दिली क्लीन चिट
Just Now!
X