25 February 2021

News Flash

रणबीरकडे पाहणा-या दीपिकाला रणवीरने दिलेला ‘अॅग्नी लूक’ व्हायरल !

या फोटोमध्ये दोघांव्यतिरिक्त अन्य एक व्यक्ती असून या त्रिकुटाचा फोटो सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे.

छायासौजन्य : हिंदुस्तान टाईम्स

अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये चांगली मैत्री असल्याचं दिसून येत आहे. मात्र सध्या त्यांचा एक नवीनच फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांव्यतिरिक्त अन्य एक व्यक्ती असून या त्रिकुटाचा फोटो सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे.

रणबीर आणि दीपिकाने आपल्या नात्याला पूर्णविराम दिल्यानंतर दीपिका आणि रणवीर सिंग यांची जवळीक झाल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच मनीष मल्होत्राच्या ‘मिजवान फॅशन शो’मध्ये दीपिका आणि रणबीर एकत्र दिसून आले होते. या शो दरम्यान हे दोघेही आपल्या गप्पांमध्ये रंगल्याचे फोटो व्हायरलं झाले होते. यानंतर पुन्हा एकदा दीपिका आणि रणबीरचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे. मात्र या फोटोमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त रणवीर सिंगदेखील झळकला आहे. हा फोटो त्यांच्या चाहत्यांनी शेअर करत त्याला ना ना त-हेच्या कॅप्शन्सही दिल्या आहेत.
व्हायरल होत असलेल्या या त्रिकुटाचा फोटो २०१३ सालचा असून त्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वडीलांच्य़ा मृत्यूनंतर आयोजित शोकसभेदरम्यान हा फोटो काढण्यात आला होता. या फोटोमध्ये दीपिका आपल्या पूर्व प्रियकराला बघत असून रणवीर सिंहचा चेहरा रागाने लाल झाल्य़ाचे दिसून येत आहे.
संजय लीला भन्साली यांच्या ‘रामलीला’ या चित्रीकरणाच्यावेळी रणवीर आणि दीपिका एकमेकांना डेट करत असल्याचे सांगण्यात येत होते. तर दुसरीकडे रणबीर आणि दीपिकाच्या ब्रेकअपच्या चर्चाही रंगत होत्या. मात्र या फोटोवरुन या कलाकारांचे भाव उत्तमरित्या स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 6:05 pm

Web Title: ranbir kapoor ranbir singh and deepika padukone imprisoned in the same frame viral
Next Stories
1 फराह खानच्या पायाला दुखापत, तीन आठवडे व्हिलचेअरचा आधार
2 Photo: सोनम- आनंदच्या लग्नाला यायचं हं! ई-वेडिंग कार्डने पाहुण्यांना आमंत्रण
3 VIDEO : ‘काला’मधील पहिलंवहिलं गाणं ‘बहुत भारी है’
Just Now!
X