आपल्या दमदार अभिनय कौशल्यामुळे चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी इमेज तयार करणारा अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. उत्तम अभिनयशैली आणि भूमिका निवडतानाचा चोखंदळपणा यामुळे रणदीपकडे आज बॉलिवूडचा ‘रफ अँण्ड टफ हिरो’ म्हणून पाहिलं जातं. बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणारा रणदीप अनेक वेळा या ना त्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. त्यातच एका चित्रपटामुळे तो विशेष चर्चेत आला होता. या चित्रपटामध्ये रणदीपने त्याच्या सह कलाकार अभिनेत्यासोबत लीप लॉक सीन दिल्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली होती.

ऑस्ट्रेलियामध्ये एमबीएचं शिक्षण घेतल्यानंतर एका विमान कंपनीमध्ये काम करत असताना रणदीपला मॉडलिंग करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मॉडेलिंग क्षेत्राकडे वळलेल्या रणदीपने दिल्लीतील थिएटरमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान दिग्दर्शिका मीरा नायर यांनी रणदीपचा अभिनय पाहिला आणि त्याला बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ब्रेक दिला. २००१ साली ‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रणदीपने या चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले. मात्र त्याचे ‘जिस्म २’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’ हे चित्रपट विशेष चर्चिले गेले. या दोन्ही चित्रपटांमध्ये रणदीपने प्रचंड बोल्ड आणि इंटिमेट सीन दिले.

‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटात रणदीपने एका समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यामुळे या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्याला सहअभिनेत्यासोबत किसिंग सीन करायचा होता. विशेष म्हणजे रणदीपने या भूमिकेसाठी लीप लॉक सीन दिला होता. त्याच्या या सीननंतर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती. त्यासोबतच या सीनचा एक व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता.

दरम्यान, या चित्रपटाप्रमाणेच त्याचा ‘जिस्म २’ हा चित्रपटही विशेष गाजला होता. या चित्रपटामध्ये रणदीपने मोठ्या प्रमाणावर इंटिमेट सीन दिले होते. विशेष म्हणजे चित्रपटांप्रमाणेच रणदीप त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे. आतापर्यंत त्याचं नाव अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंह आणि लीसा हेडन यांच्याशी जोडलं गेलं आहे.