बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात तो हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थसोबत अॅक्शन करताना दिसत आहे. परंतु आज एका हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या रणदीपकडे गेल्या तीन वर्षांपासून काहीच काम नव्हतं. ‘हायवे’, ‘सबरजित’, ‘रंग रसिया’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाचे प्रदर्शन करणारा रणदीप गेल्या तीन वर्षांपासून लॉकडाउनमध्येच होता असा आश्चर्यचकित करणारा खुलासा त्याने केला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – भारतातील लोक ‘या’ अभिनेत्रीला दररोज करतात सर्च

मिडडेला दिलेल्या मुलाखतीत रणदीपने ‘एक्सट्रेक्शन’ चित्रपटाबाबत काही किस्से सांगितले. तो म्हणाला,
“२०१६मध्ये मी ‘सबरजित’ या चित्रपटात शेवटचं काम केलं होतं. तेव्हापासून माझ्याकडे काहीच काम नव्हतं. मी कामाच्या शोधात होतो, परंतु कोणीच काम देत नव्हतं. अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केल्यानंतरही तब्बल तीन वर्ष मी कामाशिवाय काढली. दरम्यान मी नेटफ्लिक्सच्या कुठल्याशा शोसाठी ऑडिशन दिलं होतं. त्या शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही, परंतु त्या ऑडिशनमुळे मला ‘एक्सट्रेक्शन’सारखा चित्रपट मिळाला. कामाशिवाय काढलेले तीन वर्ष माझ्यासाठी लॉकडाउनसारखेच होते. या तीन वर्षांमध्ये मी जणू लॉकडाउनमध्येच होतो की काय असं वाटत होतं. असा अनुभव रणदीपने सांगितला.

सर्वाधिक वाचकपसंती – “लग्न केलं ही बातमी आई-बाबांना सांगायला विसरलो”; अभिनेत्याने सांगितला तो किस्सा

‘एक्सट्रेक्शन’ हा एक अॅक्शनपट आहे. हा चित्रपट भारत आणि अमेरिकेच्या सैनिकांवर आधारित आहे. या चित्रपटात रणदीपने भारतीय सैनिकाची तर हेम्सने अमेरिकन सैनिकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण भारतातच झाले आहे. ‘एक्सट्रेक्शन’ची पटकथा ‘अॅव्हेंजर्स’चा दिग्दर्शक जो रुसो याने लिहिली आहे.