News Flash

माझे त्याच्यावर फार प्रेम आहे- कंगना रणौत

आपली काळजी घेईल असा एखादा साथिदार असावा

अभिनेत्री कंगना रणौत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या प्रेमसंबंधांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. पण आता कंगनाने आपल्या रिलेशनशीपबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे. तिने स्पष्ट सांगितले आहे की तिचे एका व्यक्तीवर फार प्रेम आहे. पण आता मला कोणाला डेट करायचे नाही तर लग्न करायचे आहे असेही तिने सांगितले. सिनेसमिक्षक अनुपमा चोप्रा यांच्याशी केलेल्या बातचीतमध्ये कंगना म्हणाली की, सुरुवातीच्या २० वर्षांमध्ये, लोकं लग्न का करतात असा प्रश्न आपल्याला पडतो. पण २० वर्षांनंतर आपले विचार बदलायला लागतात. आपण एका वेगळ्या नजरेने गोष्टी पाहायला लागतो.

आपली काळजी घेईल असा एखादा साथिदार असावा असे प्रत्येकालाच वाटते. कंगना पुढे म्हणाली की, आता नाती सांभाळायला मी पूर्णपणे तयार झाले आहे. लग्नाच्याच बाबतीत ती पुढे म्हणाली की, लग्नानंतर तिला बायको नवऱ्याचे नाते पूर्णपणे निभावयाचे आहे, पण यासाठी समोरच्यानेही याच दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. कंगना म्हणाली की, तिला तिचे खरे प्रेम मिळाले आहे. तिचे त्या व्यक्तीवर फार प्रेम आहे. या रिलेशनशिपमध्ये ती फक्त डेट करायचेच असे न बघता तिला त्या व्यक्तीसोबत लग्नही करायचे आहे.

आतापर्यंत कंगनाचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे. यात सगळ्यात आधी आदित्य पांचोलीसोबत तिचे नाव जोडले गेले. त्यानंतर अध्ययन सुमनसोबतही तिचे नातेसंबंध होते. पण जेव्हा हृतिक रोशनसोबतचे तिचे नातेसंबंध सर्वांसमोर आले तेव्हा त्यांच्यातले वाद विकोपाला गेले. या तिघांशिवाय कंगनाने स्वतः सांगितले होते की ती एका ब्रिटीश व्यक्तीला डेट करत आहे.

दरम्यान, कंगनाचा ‘रंगून’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ‘रंगून’ या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक विशाल भारद्वाज एका वेगळ्याच कथानकाच्या मदतीने प्रेक्षकांवर छाप पाडण्यासाठी तयार झाले आहेत. पण, या सिनेमाच्या कलाकारांमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ आहे असेच म्हणावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता शाहिद कपूर यांच्यात काही कारणांवरुन खटके उडाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, शाहिदने मात्र असे काहीही झाल्याच्या चर्चांना दुजोरा दिला नव्हता. कंगनाने देखील शीतयुद्धावर पूर्णविराम देताना चित्रीकरणाच्या सेटवर मैत्री करण्यासाठी नाही तर कामासाठी एकत्र येतो, असे सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 9:32 pm

Web Title: rangoon movie actress kangana ranaut wants get married
Next Stories
1 तब्बल एवढ्या कोटींना विकले गेले ‘द गाझी अॅटॅक’चे डिजिटल राइट्स
2 ‘डॉन’ शशिकलांवर रामू काढणार सिनेमा
3 सलमानची अॅमी जॅकसनला पसंती
Just Now!
X