News Flash

“रिलेशनशीपमध्ये मला त्रास होतो”; रानी चॅटर्जीने व्यक्त केलं ब्रेकअपचं दु:ख

सुपरस्टार अभिनेत्री ब्रेकअपमुळे दु:खी

रानी चॅटर्जी भोजपुरी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्राम पोस्ट, फोटो, व्हिडीओज यांच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र यावेळी रानी तिच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. “रिलेशनशीपमध्ये मी कायम दु:खी असते.” असं म्हणत तिने एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमुळे तिचं ब्रेकअप झालं की काय? अशी शंका चाहत्यांमध्ये उत्पन्न झाली आहे.

अवश्य पाहा – ‘वंडर वुमन’चा ओपनिंग सीन पाहिलात का?; १३ वर्षीय अभिनेत्रीचे स्टंट पाहून तोंडात बोटे घालाल

“रिलेशनशीपमध्ये मी कायम दु:खी असते. पण यावेळी तुला त्रास होणार नाही. हृदय सांगतेय आपण मूव्ह ऑन करुया. खरं सांगायचं झालं तर तू तुझ्या मार्गावर जा अन् मी माझ्या मार्गावर जाते.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट रानीने केली आहे. ही पोस्ट पाहून तिचं ब्रेकअप झालं आहे की काय? अशी शंका चाहत्यांमध्ये रंगू लागली आहे. अर्थात या पोस्टमध्ये आपल्या बॉयफ्रेंडचं नाव सांगितलेलं नाही.

अवश्य पाहा – ड्रग्जवरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं खुलं आव्हान; सिद्ध करा अन्…

अवश्य पाहा – अरे बापरे… ही अभिनेत्री एका फोटोशूटसाठी घेते २०० कोटी

रानी चॅटर्जी भोजपुरी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘ससुरा बडा पैसेवाला’ या चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सिरुवात केली होती. पहिल्याच चित्रपटात वयाच्या १६व्या वर्षी मादक दृश्य देत तिने भोजपुरी सिनेसृष्टीत खळबळ माजवली होती. त्यानंतर तिने ‘दामाद जी’, ‘फुल बने अंगार’, ‘रानी नंबर ७८६’, ‘रावडी रानी’, ‘घरवाली बाहरवाली’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं. ‘मस्तराम’ या वेब सीरिजमध्ये दिलेल्या हॉट सीनमुळे सध्या ती प्रचंड चर्चेच होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2020 5:12 pm

Web Title: rani chatterjee shares a picture with a message mppg 94
Next Stories
1 “शीख, मुस्लिम, हिंदू प्रत्येक जण माझ्या विरोधात”; कंगनाने व्यक्त केलं दु:ख
2 “शेवटी आत्मसन्मान महत्वाचा..”; अभिनेता संतापला म्हणून कर्मचाऱ्यांनी सोडला चित्रपट
3 दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषची हॉलिवूड वारी; बिग बजेट चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
Just Now!
X