News Flash

सैफ करीनाला डेट करतोय हे कळताच रानी मुखर्जीने दिला ‘हा’ सल्ला

व्हॉट वुमन वॉन्टमध्ये करीनाने केला खुलासा

बॉलिवूडमधील पॉवर कपल पैकी एक म्हणजे अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान. करीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मात्र, आता सैफने केलेल्या एका वक्तव्यामुळे हे कपल पुन्हा चर्चेत आलं आहे.

करीनाच्या चॅट शो ‘व्हॉट वुमन वॉन्ट’मध्ये  सैफ अली खानने हजेरी लावली होती. शोमध्ये मजा मस्ती सुरू असताना सैफने राणी मुखर्जीने एकदा त्याला डेटिंग टीप्स दिल्याचे सांगितले. “तू आणि मी डेट करत असताना राणीने  मला एक सल्ला दिला होता, जो मला अजूनही चांगलाच लक्षात आहे. मी कधीही एका वर्किंग अभिनेत्रीला डेट केलं नव्हतं. त्यामुळे तिने मला तो सल्ला दिला होता. “तू एखाद्या पुरूषासोबत रिलेशनशिपमध्ये आहेस असा विचार कर किंवा त्या पद्धतीने वाग,” असा सल्ला मला राणीने दिला होता.

पुढे सैफ म्हणाला, “करीनाला तुझ्याप्रमाणे समान वागणूक दे, असं ती म्हणाली होती. तिचा अर्थ असा होता की, स्त्री आणि पुरूष असा भेदभाव तू करू नकोस. एका घरात दोन अभिनेते आहेत असा विचार केलास तर तुम्हाला त्रास होणार नाही आणि ती बरोबर म्हणाली होती, असं मला वाटते.” यावर करीना म्हणाली की, ही टीप तर मला फारच आवडली. ही टीप सर्व पुरूषांनी लागू केली पाहिजे. दरम्यान, ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ-करीनाने लग्नगाठ बांधली असून त्यांना तैमूर हा लहान मुलगा आहे. विशेष म्हणजे करीना लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 3:38 pm

Web Title: rani mukerji has given a tip to saif ali khan after knowing he is dating kareena dcp 98
Next Stories
1 सिद्धार्थशी लग्न झाल्यानंतर मितालीचा महत्त्वाचा निर्णय; सोशल मीडियावरून दिली ‘ही’ माहिती
2 सुबोध भावेपासून बिग बींपर्यंत; सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
3 ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ
Just Now!
X