02 March 2021

News Flash

Video : ती परत आली आहे; ‘मर्दानी 2’चा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटामध्ये राणी शिवानी शिवाजी राव ही भूमिका साकारत आहे

बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालण्यासाठी हिरोइनसोबत हिरोच हवाच, हे समीकरण राणीनं कित्येक वर्षांपूर्वी खोडून काढलं. ‘नो वन किल जेसिका’, ‘मर्दानी’, ‘हिचकी’ अशा दमदार कथानकाच्या जोरावर तिनं अभिनेत्याविनाच चित्रपट सुपरहिट करून दाखवले. त्यानंतर आता ती लवकरच ‘मर्दानी 2’ या चित्रपटामध्ये झळकणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘मर्दानी 2’ या चित्रपटामध्ये राणी इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी राव ही भूमिका साकारत आहे. प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहता हा चित्रपट कोटामध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या सत्यघटनेवर आधारित आहे. हा ट्रेलर यश राज फिल्म्सने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला असून “ती परत आली आहे. ती थांबणार नाही. ही आहे शिवानी शिवाजी राव”, असं कॅप्शन दिलं आहे.

चित्रपटाची कथा राजस्थानमधील कोटा येथे एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेभोवती फिरताना दिसून येते. ट्रेलरमध्ये दिसून येतंय की, कोटामध्ये एका तरुणीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात येते. त्यानंतर ही केस शिवानी राव (राणी मुखर्जी) हिच्याकडे जाते आणि ती दोषींना शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न करते. या प्रकरणाचा छडा लावत असतानाच अशाच स्वरुपाची आणखी एक घटना घडणार असल्याचं शिवानीच्या लक्षात येतं आणि ही घटना थांबविण्यासाठी ती पूर्ण प्रयत्न करते. मात्र या संपूर्ण ट्रेलरमध्ये कोठेही दोषी व्यक्तींचा चेहरा दाखविण्यात आला नसून त्याचा केवळ आवाज ऐकू येत आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये राणी खऱ्या अर्थाने मर्दानी रुपात पाहायला मिळत आहे. तिचा लूक आणि स्मार्टनेस तिच्या भूमिकेसाठी अत्यंत साजेसा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन गोपी पुत्रन करत असून निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत. यश राज फिल्म्सअंतर्गत चित्रीत होणारा हा चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 1:33 pm

Web Title: rani mukerji mardaani 2 trailer kota rape case true story ssj 93
Next Stories
1 प्रियंका-निकनं घेतलं नवं घर; किंमत तुम्ही ऐकली का?
2 …म्हणून बिग बींनी मागितली कोलकातावासीयांची माफी
3 जाणून घ्या रणवीर दीपिकाची लव्ह स्टोरी
Just Now!
X