बॉलिवूडची ‘खंडाला गर्ल’ गेल्या अनेक काळापासून प्रेक्षकांवर आणि चंदेरी दुनियेवर अधिराज्य गाजवत आहे. खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रित करत राणीने काही दिवस या झगमगाटापासून फारकत घेतली होती. मात्र ती आता पुन्हा आपल्या करिअरकडे वळल्याचे दिसून येत आहे. तिने आतापर्यत केलेले प्रत्येक चित्रपट विशेष गाजलेले आहेत. प्रत्येक चित्रपटाची निवड ती विचारपूर्वक करत असल्याचे सांगण्य़ात येत आहे.

‘प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीच असतो. त्यामुळे ज्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना समाजिक संदेशाबरोबरच त्यांचे मनोरंजन होते अशा चित्रपटांची निवड करण्याकडे माझा जास्त कल असतो,’ असे राणीने सांगितले.

वाचा : रणवीर- दीपिकामध्ये नक्की चाललयं तरी काय ?

राणीने आतापर्यत वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निवड केलेली आहे. त्यामध्ये ‘बिच्छु’, ‘बंटी और बबली’, ‘नो वन किल जेसिका’, ‘मर्दानी’, ‘हिचकी’ या चित्रपटांचा समावेश आहे.

एखाद्या चित्रपटाविषयी माझ्याकडे विचारणा केल्यावर माझ्या मनाला ज्या चित्रपटाची कथा भावेल आणि जी समाजाच्या दृष्टीने सकारात्मक तसेच त्यांचे मनोरंजन करणारा असेल अशाच चित्रपटांना मी प्राधान्य देते, असेही राणीने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी चर्चा करतांना सांगितले.
१९९७ साली ‘राजा की आयेगी बरात’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राणीला आतापर्यंत ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.