News Flash

फॅशनच्या दुनियेत ‘हार्पिक’ स्वागत; रणवीरचा हा फोटो पाहिलात का?

याआधी ही अनेक वेळा रणवीर सिंगला त्याच्या लूकमुळे ट्रोल करण्यात आले होते

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. तो कोणत्याही भूमिकेला योग्य तो न्याय देतो. या व्यतिरिक्त रणवीर त्याच्या ड्रेसिंग स्टाईलमुळेदेखील नेहमी चर्चेत असतो. त्याची ड्रेसिंग स्टाईल अतिशय हटके असते. त्याच्या या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा तो ट्रोलही झाला आहे. आतादेखील असेच काहीसे घडले आहे.

यावेळी रणवीरला ट्रोल करणारे दुसरे तिसरे कोणी नसून रणवीर स्वत: आहे. नुकताच रणवीरने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणवीरने निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, त्यावर लाल व निळ्या रंगाचे जॅकेट, पांढऱ्या रंगाचे बूट आणि गळ्यात चेन घातली आहे. या लूकमध्ये रणवीर अत्यंत ग्लॅमरस आणि हटके अंदाजात दिसत आहे. तसेच त्याच्या या लूकवर अनेक तरुण-तरुणी फिदा झाले.

रणवीरने त्याचा फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने स्वतःच्या कपड्यांच्या रंगाची तुलना हार्पिक बॉटलच्या रंगाशी करत ‘हार्पिकच्या बाटल्या आणि रणवीर सिंगच्या कपड्यांचा रंग सारखाच दिसतो’ असे म्हटले आहे.

याआधीही अनेकदा रणवीर सिंगला त्याच्या लूकमुळे ट्रोल करण्यात आले होते. तसेच त्याच्यावर अनेक मीम्स तयार करण्यात आले होते. ‘गली बॉय’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरदेखील रणवीर सिंगला ट्रोल करण्यात आले होते. तसेच त्याच्या लूकची अनेकांशी तुलनादेखील करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 5:22 pm

Web Title: ranveer compare his dressing style with toilet cleaner
Next Stories
1 ‘ह.म.बने तु.म.बने’ : नात्यांची आंबटगोड रेसिपी
2 ‘जिवलगा’ मालिकेचं काळजाला भिडणारं शीर्षकगीत
3 ‘रात्रीस खेळ चाले २’मधील सरिताबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?
Just Now!
X