बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या नात्याबद्दल सर्वच स्तरांमधून चर्चा होत आहे. हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दीपिका किंवा रणवीर यांनी त्याविषयीचा कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही. मात्र, प्रत्येक वेळी ते आपल्या एकमेकांबद्दलच्या प्रेमभावना व्यक्त करत असतांना आढळून आले.

चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला चित्रपटामध्ये रणवीर आणि दीपिका यांच्यात जवळीकता दिसून आली. त्यानंतर ते दोघेही ‘पद्मावत’, ‘बाजीराव- मस्तानी’ या चित्रपटांमध्ये एकत्र दिसून आले. विशेष म्हणजे हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरुन त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला.

‘पद्मावत’ चित्रपटात रणवीरने क्रूर सुलतान अलाउद्दीन खिल्लजीची भूमिका साकारली होती. यावेळी या रणवीर अनेक स्तरांतून टीका होत होत्या. मात्र त्याकडे फारसे लक्ष न देता आपण रणवीरविषयी जास्तच काळजी करत असल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. रणवीरच्या भूमिकेविषयी आपण नेहमीच प्रामाणिक प्रतिक्रिया देत असल्याचंही तिने स्पष्ट केले होते. या दोघांच्याही नात्यांणध्ये असणारी सहजता पाहता येत्या काळात आता ही केमिस्ट्री आणखी कोणते वळण घेणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

सध्या रणवीर सिंग त्याच्या अगामी गली बॉय या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासह अभिनेत्री आलिया भट्ट देखील स्क्रिन शेअर करणार आहे.तर रणवीरचा ‘सिम्बा’ हा चित्रपट देखील वर्षाअखेरपर्यंत प्रदर्शित होईल. तर दिपिकाने तिच्या कोणत्याच आगामी चित्रपटाविषयी खुलासा केलेला नाही.