News Flash

व्हायरलः रणवीरचे पहिले ऑडिशन पाहून तुम्हीही हसाल

यात तो काही डान्स स्टेप्स करताना दिसतो.

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने आज चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज तो आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असला तरीही त्याचे पाय जमिनीवरच असल्याचे आपण पाहतो. त्याच्या मनमोकळ्या स्वभावामुळेच त्याचे असंख्य चाहते आहेत.
तुम्हाला माहित आहे का रणवीरला बॉलीवूडमध्ये जम बसवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली होती. त्याने सुरुवातीच्या काळात अनेक ठिकाणी ऑडिशनही दिले होते. त्यापैकी एका ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात तो काही डान्स स्टेप्स करताना दिसतो. त्याचे हे नृत्य पाहून आजूबाजूला उपस्थित असलेल्या मंडळींना आपले हसू अनावर झालेले यात दिसते. तुम्हीही पाहा हा व्हिडिओ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2016 12:15 pm

Web Title: ranveer singh hilarious unseen video get viral on social media
टॅग : Ranveer Singh
Next Stories
1 आलिया-रणवीरचा ‘मिस्ट्री प्रोजेक्ट’
2 सोनमसाठी ऐश्वर्याची गच्छंती
3 पाहाः श्रद्धा आणि टायगर श्रॉफच्या ‘बागी’चा ट्रेलर
Just Now!
X