21 October 2020

News Flash

Throwback: ओळखा पाहू बॉलिवूडमधील ‘हा’ अभिनेता कोण?

हा अभिनेता अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकला आहे

‘रामलीला’, ‘सिम्बा’, ‘गली बॉय’ या सारख्या चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिस दणाणून सोडणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. यशराज बॅनरच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली. अभिनयासोबतच रणवीर त्याच्या वेगवेगळ्या फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. हटके आणि नव्या स्टाइल कॅरी करणं रणवीरला विशेष आवडतं. त्यामुळे पुरस्कार सोहळा असो किंवा अन्य कोणतंही ठिकाण, रणवीर त्याच्या अतरंगी स्टाइलमध्ये दिसून येतो. विशेष म्हणजे त्याच्या स्टाइलचे अनेक जण चाहते असून ते रणवीरला फॉलो करताना दिसतात. मात्र युवकांमध्ये स्टाइल आयकॉन असलेला हा अभिनेता कॉलेज जीवनात प्रचंड वेगळ्या लूकमध्ये वावरत असे. याचं नुकताच एक पुरावा रणवीरने दिला आहे. त्याच्या एका चाहत्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या कॉलेज जीवनातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो प्रचंड वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे.

या चाहत्याने शेअर केलेला फोटो रणवीरच्या कॉलेज जीवनातील असून यामध्ये त्याच्यासोबत त्याची मैत्रीण पिया त्रिवेदी दिसून येत आहे. विशेष म्हणजे या फोटोत रणवीरने क्लीन शेव केली असून त्याचे केस खांद्यापर्यंत वाढले आहेत. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये रणवीरच्या या लूकची चर्चा रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

#throwback #ranveersingh @ranveersingh

A post shared by ranveer singh (@ranveer_singh_is_the_best) on

तारुण्यावस्थेतील फोटोसोबतच त्याने रणवीरच्या लहानपणीचाही फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो अभिनेता अक्षय कुमारसोबत दिसून येत आहे. या फोटोमध्ये मात्र त्याचे केस लहान कापले आहेत. या फोटोला त्याने फॅनबॉय मुम्हमेंट असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, त्याचे हे दोन्ही फोटो पाहता रणवीर लहानपणापासूनच स्टाइलच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करताना दिसून येतो.  एका मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या अतरंगी स्टाइल स्टेटमेंटविषयी विचारणा करण्यात आली होती. यावेळी ‘जे मनात येतं ते करतो’, असं उत्तर त्याने दिलं होतं. त्यामुळे त्याच्या या फोटोंकडे पाहून याची प्रचिती येते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 12:07 pm

Web Title: ranveer singh is unrecognisable in long hair in this throwback photo ssj 93
Next Stories
1 दीपिकासोबत ’83’च्या सेटवर धमाल करतेय ही लहान मुलगी
2 सोळा तास उपाशी राहून राम कपूरने केलं इतके किलो वजन कमी, फोटो व्हायरल
3 आवर्जून ऐकायला हवीत अशी विठ्ठलाची २० भक्तिगीते
Just Now!
X