02 March 2021

News Flash

रणवीरसाठी २०१८ ची सुरुवातही गोड आणि शेवटही!

जानेवारी २०१८ मध्ये रणवीरचा बहुप्रतिक्षीत असा 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित झाला.

‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला अभिनेता रणवीर सिंग हा आजच्या घडीला बॉलिवूडचा सुपरस्टार झाला आहे. विशेष म्हणजे रणवीरची २०१८ ची सुरुवातही धमाकेदार झाली होती आता या वर्षांचा शेवटही रणवीरसाठी स्पेशल ठरणार आहे.

जानेवारी २०१८ मध्ये रणवीरचा बहुप्रतिक्षीत असा ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणवीरनं अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती. २०१८ मधला हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला. या चित्रपटात रणवीरनं साकारलेल्या खिलजीच्या भूमिकेचं खूपच कौतुक झालं. विशेष म्हणजे याच भूमिकेमुळे यंदाचे सर्वाधिक पुरस्कार रणवीरच्या नावे जमा झाले. या चित्रपटानं भारतात २५० कोटींहून अधिकची कमाई केली.

यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही रणवीरनं पटकावला. विशेष म्हणजे वर्षांचा शेवटही रणवीरचा धमाकेदार झाला आहे. गेल्याच आठवड्यात त्याचा ‘सिम्बा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं दोन दिवसांत ४४ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. ‘सिम्बा’ १०० कोटींचा टप्पा सहज पार करेल असा अंदाज पूर्वीच चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला होता. त्यामुळे सुपरहिट चित्रपटापासून सुरूवात केलेल्या रणवीरनं २०१८ चा शेवटही सुपरहिट चित्रपटानचं केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 11:07 am

Web Title: ranveer singh made 2018 year very special
Next Stories
1 ‘विरुष्का’च्या लग्नाचे फोटो पाहून सोनमला आलं रडू
2 दीपिका कक्कर इब्राहिम ठरली ‘Big Boss 12’ ची विजेती
3 कादर खान यांच्या मृत्यूच्या अफवा, मुलाकडून खुलासा
Just Now!
X