चीनमधून फैलाव झालेला करोना विषाणू आता जगभरातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरला आहे. सामान्य नागरिकांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यत प्रत्येक जण स्वत:ची काळजी घेताना दिसत आहे. त्यामुळे सध्या नागरिक आणि सेलिब्रिटी घरीच राहणं पसंत करत आहेत.यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीदेखील स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. विशेष म्हणजे अतरंगी फॅशनसाठी ओळखला जाणारा रणवीर या दिवसांमध्येदेखील घरी राहून असेच काही उद्योग करत आहे. त्याने सोशल मीडियावर एक मजेशीर फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिली आहे.
रणवीरने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो प्रचंड भयानक दिसत आहे. खांद्यापर्यंत वाढलेले केस, निस्तेज ओठ आणि डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे अशा लूकमध्ये तो दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करत, ‘जेव्हा मी क्वारंटाइनमधून बाहेर पडेन’, असं कॅप्शन रणवीरने या फोटोला दिलं आहे. विशेष म्हणजे क्वारंटाइनमध्ये राहून अशी अवस्था होत असल्याचं रणवीरने या फोटोतून सांगायचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, करोना विषाणूविरोधात जीवाचा धोका पत्करून लढणारे डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर योद्ध्यांसाठी देशातील लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाने रविवारी टाळ्यास,थाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले. यात दीपिका आणि रणवीरनेदेखील टाळ्या वाजवून आभार मानले.